Mahayuti women leaders on Satej Patil : ''..आता सतेज पाटील आमदारकीचा राजीनामा देणार का?'' महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सवाल!

Mahayuti women leaders to Congress News : जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण, ज्यावरून महायुतीच्यावतीने काँग्रेस अन् सतेज पाटलांवर निशाणा साधला गेला आहे.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Satej Patil latest update : माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे बंधू पृथ्वीराज पाटील यांच्यावर ठाणे जिल्ह्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा नोंद झाल्याची माहिती आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेमुळे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. नव्हे तर पत्रकार परिषद घेत माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्यासमोर सवाल उपस्थित केले आहेत. झालेल्या घटनेबाबत सतेज पाटील निषेध नोंदवणार आहेत का? झालेल्या कृत्याबद्दल तुम्ही राजीनामा देणार आहात का? असे सवाल महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

''पृथ्वीराज संजय पाटील यांच्या विरोधात बलात्काराचा गंभीर गुन्हा नोंद झाला आहे. पृथ्वीराज पाटील यांनी कोल्हापूर, पुणे आणि ठाणे येथे, लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केले. इतकेच नव्हे तर संबंधित युवतीला गर्भपात करण्यास भाग पाडले अशी ही अत्यंत गंभीर घटना आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या या गंभीर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही केस दाबण्याचा माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस(Congress) नेत्यांनी प्रयत्न केला.'' असे आरोप महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

Satej Patil
Raju Shetti on Budget : 'कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळात तर राज्यकर्ते, अधिकारी अन् दलाल राजमहालात' ; राजू शेट्टींचे टीकास्त्र!

तसेच, पीडित तरुणीने आपल्यावरील अन्यायाबाबत वाचा फोडली. बलात्कार आणि गर्भपात यासारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयित पृथ्वीराज पाटील यांना पोलिसांनी ताबडतोब अटक करावी अशी आमची मागणी आहे. संबंधित पीडित युवतीला न्याय मिळावा, यासाठी महायुतीमधील(Mahayuti) सर्व नेते कार्यकर्ते त्या युवतीच्या पाठीशी उभे राहतील. असे सांगूनयान या प्रकरणाबाबत सतेज पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

महिला पदाधिकाऱ्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे -

१) तरुणीवर अत्याचार करणाऱ्या पृथ्वीराज संजय पाटील यांचा आपण निषेध करणार का ?

२) पोलिसांकडून जलद आणि नि:पक्ष तपास व्हावा, यासाठी पोलीस यंत्रणेवर दबाव आणणार नाही, असे जाहीर करता का ?

३) संशयित आरोपी पृथ्वीराज संजय पाटील यांची मालमत्ता आणि आजवरचे त्यांचे वर्तन यावर प्रकाश टाकणार का ?

४) या कृत्याची नैतिक जबाबदारी घेऊन आणि स्वतःच्या कुटुंबातील या लाजिरवाण्या घटनेचा निषेध म्हणून, माजी गृहराज्यमंत्री आमदारकीचा राजीनामा देणार का ?

५) काँग्रेससह महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांकडून, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा मागितला जाईल का ?

६) संबंधित पीडित युवतीला न्याय मिळावा, यासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील कोणती भूमिका घेणार ?

Satej Patil
Prakash Abitkar : हद्दवाढ नाही तर विकास नाही! उपमुख्यमंत्री अजितदादांनी आरोग्यमंत्र्यांना खडसावले, आबिटकारांनी सांगितली 'आप बीती'

वरील प्रश्नांची उत्तरे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, त्यांचे बंधू संजय डी पाटील आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीरपणे द्यावीत. या प्रकरणाचा जलद गतीने तपास होऊन फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा, अशी मागणी सुद्धा महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी करत एका हत्या प्रकरणात कनेक्शन असल्याच्या आरोपावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या एकामंत्र्यांचा राजीनामा मागितला. आता सतेज पाटील यांनी सुद्धा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी केली गेली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com