Satej Patil Vs Mahayuti: महायुतीकडून काँग्रेसच्या सतेज पाटलांचा 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचा प्लॅन, पण...

Kolhapur Politics: काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचे पुतणे पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर कधी नाही ते महायुतीतील पदाधिकारी एकत्र येत पाटील यांना सवाल उपस्थित करून कोंडीत पकडण्याची चाल खेळली गेली आहे.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhpur News : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांना महायुतीकडून घेरण्याचा डाव सुरू झाला आहे. निवडणुकीत 10 मतदार संघात महायुतीचे सर्व आमदार निवडून आल्यानंतर सतेज पाटील यांच्या राजकीय महत्त्वकांक्षाला ब्रेक लागला. राज्यस्तरावर काँग्रेसकडून मिळणारी नेतृत्वाची जबाबदारी आणि राजकीय वर्तुळात मिळालेले महत्त्व पाहून सतेज पाटलांना (Satej Patil) महायुतीकडूनच आता खिंडीत गाठण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पुतणे पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर जिल्ह्यातील महायुतीकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. एकीकडे जिल्ह्यात सर्व विरोधकांना हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी केली आहे. मात्र, जिल्ह्यात सतेज पाटील यांचे वाढलेले महत्त्व लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर खच्चीकरण करून मनोबल ढासळवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेसकडून पाच उमेदवार देण्यात आले होते. या पाच विधानसभा मतदारसंघात उमेदवार निवडण्यापासून ते उमेदवारी, जागा खेचून आणण्यासाठी सतेज पाटील यांची महत्त्वाची जबाबदारी राहिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाल्यानंतर त्याचा धसका महायुतीने देखील घेतला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सावध पावले उचलत महायुतीतील (Mahayuti) राष्ट्रवादी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेने योग्य उमेदवारांची निवड करत महाविकास आघाडीला निवडणुकीत धोबीपछाड दिला.

Satej Patil
Dhananjay Munde News : मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा ‘प्लॅन’ ठरला? कुणीच सुटणार नाही?

महाविकास आघाडीचे नेतृत्व म्हणून सतेज पाटील तर महायुतीचे नेतृत्व म्हणून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर जबाबदारी सोपवून विधानसभा निवडणुकीत ही पारंपारिक कट्टर विरोधक आमने सामने केले. त्यात सतेज पाटील यांच्या नेतृत्वात असलेली महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला.

तर विधानपरिषद निवडणुकीला अजून अवघी असला तरी आतापासूनच महायुतीने सतेज पाटील यांना घेरण्याची रणनीती आखली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एक मतदारसंघात प्रचार करायला लागल्याने अनेक विरोधक सतेज पाटील यांचे तयार झाले आहेत. त्यामुळे पाटील यांना विधानपरिषद निवडणुकीत मदत करतील हे चित्र पुसट आहे.

Satej Patil
Maharashtra Politics : बहीण-भाऊ मंत्री झाले, अन् विरोधकांच्या डोळ्यात खुपू लागले; अजय मुंडे म्हणाले, 'संपूर्ण कुटुंब धनूभाऊच्या मागे भक्कम उभं'

शिवाय माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सावकार मादनाईक यांच्या नावाची घोषणा केल्याने बरेचसे चित्र स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर विस्कटलेली महायुती आज देखील एकमेकांच्या व्यासपीठावर दिसत नाही. कार्यकर्ते पदाधिकारी हे देखील द्विधावस्थेत आहेत.

काही नेते मंत्रिपदावर उत्तर काही पालकमंत्री पदावरून नाराज आहेत. आपल्या नेत्याला मंत्रिपद न मिळाल्याने अनेकांनी इतर कार्यक्रमाला दांडी लावल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे. विखुरलेल्या महायुतीकडे पाहता आपापसातील समझोता एक्सप्रेस कधी धावणार हे सांगणे कठीण होते.

Satej Patil
Maharashtra Budget 2025: अजितदादांनी शिंदेंना मागे टाकलं; तिसऱ्या क्रमांकावर असतानाही दुसऱ्या क्रमांकाचा निधी राष्ट्रवादीला

मात्र, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचे पुतणे पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर कधी नाही ते महायुतीतील पदाधिकारी एकत्र येत पाटील यांना सवाल उपस्थित करून कोंडीत पकडण्याची चाल खेळली गेली आहे. त्याला पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सहमती असल्याशिवाय काही होऊ शकत नाही अशीही चर्चा आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील गटाला नामोहरण करण्याची संधी महायुती साधत असताना दिसत आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com