Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Politics : देवेंद्र फडणवीसांचे एक पाऊल मागे अन् एकनाथ शिंदेंचे टेन्शन दूर!

Devendra fadnavi Eknath Shinde : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हिंदीच्या अंमलबजावणीची जीआर रद्द करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या या घोषणेचा थेट संबध एकनाथ शिंदेंशी सोडला जातो आहे.

Roshan More

Eknath Shinde News : पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वीसंध्येला सरकारच्या चहापानवर बहिष्कार घातला. हिंदीच्या अंमलबजवानीवरून विरोध आक्रमक झाले होते. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात सरकारची कोंडी होणार हे स्पष्ट दिसत होते. त्यातच हिंदी भाषा आणि त्रिभाशा स्वीकारण्याचा माशेलकर समितीचा अहवाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वीकारल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मुद्द्यावर माघार घेणार नसल्याचेच संकेत दिले होते. मात्र, त्यामुळे एकनाथ शिंदेंची मोठी कोंडी झाली होती. हिंदींच्या मुद्या आगामी महापालिका निवडणुकीत पेटला असता तर त्याचा थेट फटका शिंदेंना बसला असता.

दोन दिवसांपूर्वी मंत्री दादा भुसे यांनी हिंदीच्या विषयावर पत्रकार परिषद घेत असताना अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांना फोन आला. त्यानंतर अचानक भुसे यांचे सूर बदलले. त्यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळताना हिंदीसाठी ठाकरेच कसे जबाबदार असल्याचे सांगितले. त्यामुळे शिंदेंनी हिंदीच्या अंमलबजावणीवर आपली भूमिका बदलल्याचे स्पष्ट झाले होते.

जीआर रद्दचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा त्यासाठी शिंदेंनी हालचाली देखील सुरु केल्या होत्या. अजित पवार हे देखील हिंदीच्या अंमलबजावणीच्या विरोधात होते. त्यामुळे जनभावना आणि आपले सहकारी या निर्णयाचे विरोधात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीच्या अंमलबजावणीचा निर्णय न रेटण्याची निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

आपणच बाळासाहेबांच्या पक्षाचे आणि विचाराचे खरे वारसदार आहोत असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदेंची हिंदीच्या मुद्यावर मोठी कोंडी झाली होती. हिंदींचा मुद्दा पुढे रेटला जात असताना मुंबईतील मराठी मतदार हे शिंदेंपासून दूर जात होते. त्याची मोठी किंमत त्यांना मुंबई महापालिका निवडणूक मोजावी लागली असती. मात्र, हिंदी अंमलबाजवणीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेत फडणवीसांनी शिंदेंचे मोठे टेन्शनच दूर केले आहे.

ठाकरे बंधुंना रोखले?

हिंदीच्या मुद्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चा काढण्याच्या तयारीत होतो. पाच जुलैची तारीख देखील त्यांनी जाहीर केली होती. त्यामुळे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मनोमिलन झाले. मोर्चाची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू होती. पण, जीआरच रद्द केल्याने या युतीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

ठाकरे बंधुंविषयी असलेली सहानभुती यातून कमी करण्याचा प्रयत्न आहे. युती झालीच तरी हिंदींच्या अंमलबजावणीचे जळते कोलीत त्यांच्या हातात नसेल याची काळजी हा जीआर रद्द करून फडणवीसांनी घेतल्याने. मराठीच्या मुद्यावर शिंदेंसाठी मोकळे रान मिळणार आहे. आम्ही कसा जीआर रद्द केला आणि ठाकरेंनी कसा माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारला ही शिंदेंची रणनीती मुंबई महापालिकेत राहण्याची त्यामुळे शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT