IPS Transfer .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

IPS Transfer News: मोठी बातमी: फडणवीस सरकारकडून पोलिस दलात फेरबदल; कृष्णप्रकाश, तेजस्वी सातपुतेंसह तब्बल 52 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra Government: राज्य सरकारने शुक्रवारी(ता.15 मे) पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. फडणवीस सरकारनं प्रशासनातील वरिष्ठ आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका कायम ठेवल्याचं दिसून येत आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं पुन्हा एकदा प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. यावेळी सरकारनं सर्वाधिक 52 आयपीएस अधिकारी व 44 राज्य पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत. सरकारने एकाचवेळी केलेल्या या मोठ्या प्रमाणातील बदल्या हा प्रशासनात चर्चेचा विषय ठरत आहे.

राज्य सरकारने शुक्रवारी(ता.15 मे) पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. फडणवीस सरकारनं प्रशासनातील वरिष्ठ आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका कायम ठेवल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात सत्तेत परतलेल्या महायुती सरकारच्या दुसर्‍या टर्ममध्ये प्रशासकीय पातळीवर मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्यातील चार आयएएस अधिकाऱ्यांच्या गुरुवारीच बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. पुण्यासह गोंदिया, नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी या नव्या अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली आहे. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, शीतल तेली-उगळे, दीपक सिंगला,मुरुगनांतम एम., असे या अधिकाऱ्यांचे बदली करण्यात आलेल्या नावे आहेत. त्यानंतर 24 तासांतच पुन्हा एकदा 52 आयपीएस अधिकाऱ्यांचे बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली झालेले काही प्रमुख अधिकारी:

कृष्ण प्रकाश - अपर पोलीस महासंचालक (फोर्स वन) - अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण)

दत्ता कराळे - विशेष पोलीस महानिरिक्षक, नाशिक परिक्षेत्र - विशेष पोलीस महानिरिक्षक, राज्य मानवी हक्क आयोग

प्रवीण पडवळ - विशेष पोलीस महानिरिक्षक (प्रशिक्षण) - विशेष पोलीस महानिरिक्षक, नाशिक परिक्षेत्र

मनोज शर्मा - विशेष पोलीस महानिरिक्षक (कायदा व सुव्यवस्था), पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) बृहन्मुंबई

सुवेझ हक - विशेष पोलीस महानिरिक्षक, (नियोजन व समन्वय) - पोलीस सह आयुक्त (प्रशासन) मुंबई

सी. के. मीना - विशेष पोलीस महानिरिक्षक, एटीएस - विशेष पोलीस महानिरिक्षक, कोकण परिक्षेत्र

संजय दराडे - विशेष पोलीस महानिरिक्षक, कोकण परिक्षेत्र - पोलीस सह आयुक्त, पुणे

रंजन शर्मा - पोलीस सह आयुक्त, पुणे - विशेष पोलीस महानिरिक्षक, कोल्हापूर

सुनिल फुलारी - विशेष पोलीस महानिरिक्षक, कोल्हापूर - विशेष पोलीस महानिरिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, (पूर्व)

मोक्षदा पाटील - पोलीस उप महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबई - अपर पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई

प्रियंका नारनवरे - अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई - पोलीस उप महानिरीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

तेजस्वी सातपुते - समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. १, पुणे - अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे शहर (पदोन्नतीने)

नित्यानंद झा - पोलीस उप आयुक्त (परिमंडल - २), नागपूर - पोलीस अधीक्षक, यवतमाळ

कुमार चिंता - पोलीस अधीक्षक, यवतमाळ - पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर

राकेश ओला - पोलीस अधिक्षक - पोलीस आयुक्त, अमरावती (पदोन्नतीने)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT