Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: फडणवीसांचा मोठा निर्णय! 'त्या' पोलीस अधिकाऱ्याचं कृत्य लाजीरवाणं; बडतर्फीचा दिला इशारा

नागरिकांचे रक्षक असलेले पोलीसच कसे भक्षक होतात? याचं एक ताजं उदाहरण नुकतंच समोर आलं आहे.

Amit Ujagare

Buldhana Police : नागरिकांचे रक्षक असलेले पोलीसच कसे भक्षक होतात? याचं एक ताजं उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. बुलढाण्यातील पोलिसांनी हे लाजीरवाणं कृत्य केलं असून एका जीवंत महिलेला मृत महिला असल्याचं दाखवून त्यांनी माणुसकीला काळीमा फासणार काम केलं आहे. हे करताना संबंधित महिलेच्या कुटुंबियांना पोलिसांनी धमकावून हा प्रकार केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणाची चर्चा आज विधानसभेत झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांचं कृत्य लाजीरवाणं होतंच अशी कबुली दिली तसंच त्यांच्या बडतर्फीच्या सूचनाही दिल्या आहेत.

विधानसभेत काय झाली चर्चा?

शिवानी कळमेकर यांच्या न झालेल्या हत्येचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला. त्यानुसार, जळगाव-जामोदमध्ये एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला, त्याचा पोलिसांना शोध लावता येत नव्हता. त्यामुळं शेजारच्या मध्य प्रदेशातील गरीब आदिवासी पिता-पुत्राला त्यांनी पकडून आणलं आणि त्यांच्यावर जबरदस्ती करुन त्यांची मुलगी जिवंत असताना देखील जो मृतदेह सापडला तो त्यांच्या बहिणीचा नसताना देखील त्यांना कबूल करायला लावलं की, तो त्यांच्या बहिणीचाच मृतदेह आहे. यातून चुकीचा मेसेज समाजात गेला आहे.

दरम्यान, या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, "पोलिसांचं वागणं हे अत्यंत चुकीचं होतं, त्यामुळं तिथले क्राईमसहित सर्व पीआय, पीएसआय या घटनेशी संबंधित सर्वजण निलंबित करण्यात आले आहेत. फौजदारी कारवाई देखील त्यांच्यावर करण्यात येणार आहे. आपल्याला माहिती आहे की, पहिलं निलंबन असतं त्यानंतर यात ज्यांचा थेट संबंध असेल अशाचं तर निष्काषणच केलं पाहिजे. त्यामुळं जे निष्काषणाला (बडतर्फीला) पात्र असतील त्यांना सेवेतून बडतर्फ देखील करण्यात येईल"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT