Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्याप्रकरणाला नवे वळण! होणारी पत्नी सिया-चेतनचे आधीच झाले होते गुप्त लग्न?

New twist in Ketan Agarwal murder case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपासादरम्यान सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी गुप्तपणे लग्न केल्याचा दावा पोलिसांनी केला. व्हॉट्सअॅप चॅटमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहे.
Lohagad Fort Ketan murder investigation details
Lohagad Fort Ketan murder investigation detailsSarkarnama
Published on
Updated on

Ketan Agarwal murder mystery update: पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून व्यावसायिक केतन अग्रवाल यांना दरीत ढकलून हत्या केल्याप्रकरणी तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केतनची होणारी बायको सिया गोयल हिचे तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी याच्याशी आधीच गुप्तपणे लग्न झाल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.

तपासादरम्यान सीया-चेतनच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन डेटा आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीची सखोल पडताळणी करण्यात आली. गेल्या सहा ते सात महिन्यांच्या डिजिटल पुराव्यांचा अभ्यास करताना सिया आणि चेतन यांनी सुमारे चार महिन्यांपूर्वी कुटुंबीयांपासून लपून गुपचूप विवाह केल्याचे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यांच्या मोबाईलमधील चॅटमधून या कथित लग्नाचे धागेदोरे मिळाल्याचेही तपास यंत्रणांनी सांगितले.

Lohagad Fort Ketan murder investigation details
Nashik Rain: नाशिकवरील ढगफूटीबाबत मोठी अपडेट! ढग सुरत-अकोलेकडे सरकले; संकट टळले, सतर्कतेचे आवाहन

पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, गुप्त विवाहानंतर केतन अग्रवाल याला कायमचा दूर करण्याचा कट रचण्यात आला असावा, असा संशय तपास यंत्रणेला आहे. १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून केतन यांना दरीत ढकलून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर आहे. या दोघांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

Lohagad Fort Ketan murder investigation details
Maval Landslide: मावळ हादरलं! दरडीखाली घर गाडल्याने शेतकरी कुटुंब संपलं, दांपत्यासह मुलाचा मृत्यू

माझ्यात हे करण्याची हिंमत नाही, तू ये...

तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, केतन अग्रवाल यांच्या हत्येचा पहिला प्रयत्न १४ जून रोजी करण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी सिया गोयल हिची हिंमत झाली नाही आणि तो प्रयत्न अयशस्वी ठरला.

यानंतर सियाने चेतन चौधरीला कथितपणे संदेश पाठवत, *"माझ्यात हे करण्याची हिंमत नाही, तू ये... आपण दोघे मिळून त्याला कड्यावरून खाली ढकलू,"* असे म्हटल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर १८ जून रोजी दोघांनी मिळून हा कट पूर्ण केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com