Devendra Fadnavis Vs Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात सरकारला लक्ष्य केले आहे. राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात जयंत पाटील यांना तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता, असे म्हटले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'जयंतराव तुमचा प्राॅब्लेमच तो आहे तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता. चुकीच्या गोष्टी सांगता. योग्य गोष्टी योग्य ठिकाणी योग्य लोकांसोबत सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात.' फडणीसांच्या वक्तव्यानंतर सभागृहात एकाच हशा पिकला.
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, 'तुम्ही दादांच ऐकत नाही आणि माझंही ऐकत नाही, हा तुमचा प्राॅब्लेम आहे.जयंतराव सारख्या नेत्यांनी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये. रोहित पवार सारख्यांचे ठीक आहे ते तरुण आहेत.'
धनंजय मुंडें यांच्या राजीनाम्या विषयी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात न सांगता पत्रकारांना सांगितले, असे म्हणत जयंत पाटलांनी सरकारवर निशाणा साधला होता. जर मंत्र्याने राजीनामा दिला असेल तर ते सभागृहाला अवगत करायला हवे चुकीच्या प्रथा परंपरा पाडून नका, असे देखील जयंत पाटलांनी सुनावले होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोफत वीज घोषणेचा फायदा 45 लाख शेतकऱ्यांना झाला आहे. पुढील दोन वर्षांत डिसेंबर 2026 पर्यंत सर्व शेतकऱ्यांना वीज ही सोलरच्या माध्यमातून दिली जाईल. 365 दिवस शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल. शेतकऱ्यांना रात्री पिकाला पाणी सोडण्याची गरज पडणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.