Swargate Bus Rape Case: स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेला पोलिसांनी पुन्हा गुनाटमध्ये आणले; नेमके 'हे' कारण आले समोर

Datta Gade News : या प्रकरणी कोर्टाने आरोपी गाडेला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असतानाच आता आरोपी गाडेला पोलिसांनी पुन्हा एकदा गुनाट गावामध्ये या कारणासाठी आणले असल्याचे पुढे आले आहे.
Pune Bus Rape Case accused datta Gade
Pune Bus Rape Case accused datta Gade Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात गेल्याच आठवड्यात उभ्या असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणाचा तात्काळ छडा लावत पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेला त्याच्या शिरूर तालुक्यतील गुनाट या गावातून अटक केली होती. दरम्यान, या प्रकारणातील पीडित तरुणीच्या वैद्यकीय अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपीने या तरुणीवर एकदा नाही तर दोनदा अत्याचार केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी कोर्टाने आरोपी गाडेला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असतानाच आता आरोपी गाडेला पोलिसांनी पुन्हा एकदा गुनाट गावामध्ये या कारणासाठी आणले असल्याचे पुढे आले आहे.

स्वारगेट बसस्थानकामधील (Swargate) बलात्काराच्या या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला होता. शिरुर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी असल्याचे पुढे आल्यानंतर शोधासाठी पोलिसांनी तब्बल तेरा पथकांची नियुक्ती केली होती. त्यामुळे गुनाट गावाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. अखेर पोलिसांनी आरोपी गाडेला त्याच्या गावातूनच रात्री एकच्या सुमारास शिताफीने गावकऱ्यांच्या मदतीने अटक केली होती.

Pune Bus Rape Case accused datta Gade
Eknath Shinde : फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा जोरदार धक्का; 'या' महत्त्वाच्या पदावरुन जवळच्या नेत्याला हटवले

त्यानंतर त्याला पुणे येथील कोर्टासमोर ( Court) उभे केले असता 12 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, या प्रकरणाचा पोलिसांकडून युद्धपातळीवर तपास सुरु आहे. आता पुन्हा एकदा पोलीस आरोपी दत्तात्रय गाडेला त्याच्या गावी गुणाटमध्ये घेऊन आले आहेत. दत्तात्रय गाडेला गुनाट गावात रात्री ज्याठिकाणी पकडले होते, तिथे पोलीस त्याला घेऊन आले आहेत.

Pune Bus Rape Case accused datta Gade
Chhagan Bhujbal : नदी जोड सर्वेक्षणासाठी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे आहे हा रामबाण उपाय !

पोलिसांना तपास कामासाठी दत्तात्रय गाडेचा मोबाईल हस्तगत करायचा आहे, त्यातून या प्रकरणात काही महत्त्वाचा पुरावा मिळू शकतो. याचा तपास करायचा आहे. त्या तपास कामासाठी आता दत्तात्रय गाडेला पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या गुणाट या गावामध्ये आणले आहे.

Pune Bus Rape Case accused datta Gade
Opposition leader : विरोधी पक्षनेतेपदासाठी आंध्र प्रदेशाप्रमाणेच राज्यातील परिस्थिती; चार दशकापूर्वीचा इतिहास काय सांगतो?

दरम्यान, स्वारगेट एसटी स्थानक बलात्कार प्रकरणात अटकेत असलेला आरोपी दत्ता गाडेचा आणखी काही कारनामे आता उघड होत आहेत. त्याच्या मोबाईलमध्ये काही फोटो आढळून आले आहेत. त्यामध्ये पोलिसांचा गणवेश अंगावर परिधान केल्याचा फोटो व्हायरल होत आहे. गाडे पोलिस असल्याचे सांगून एसटी स्थानक परिसरात मिरवत असल्याचे वृ्त आले होते. त्याच पुरावा यानिमित्ताने पोलिसांना मिळाला आहे.

पोलिसाच्या पोशाखातील त्याचा फोटो हाती लागल्याने त्यांच्यावर याप्रकरणी आणखी गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपी गाडेच्या ओळखीचा एक व्यक्ती पिंपरी-चिंचवड परिसरात पोलीस दलात आहे. गाडे याने त्या व्यक्तीचा गणवेश अंगावर परिधान करून फोटो काढल्याची प्राथमिक माहिती आहे.

Pune Bus Rape Case accused datta Gade
Ajit Pawar : बीडचे नेतृत्व आता कोणाकडे सोपवणार? अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष

दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असून शिरुर परिसरात तो एका लॉजबाहेर बसून महिलांचे छुपे व्हिडिओ काढत असल्याचे तपासात आढळले आहे. विवाहबाह्य संबध असलेल्या महिलांवर तो पाळत ठेवायचा. त्यांचे व्हिडिओ काढून त्यांना तो ब्लॅकमेल करायचा. त्यानंतर शारीरिक संबध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा, अशी माहिती सुत्रांनी दिली.

आपली व आपल्या कुटुंबियांची बदनामी नको म्हणून अनेक महिला गाडे याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हत्या. त्यामुळे गाडे यांचा असे गुन्हे करण्याचा आत्मविश्वास वाढला होता. शिरुर परिसरातील लॉजच्या बाहेर बसून तो विवाहबाह्य संबध असलेल्या महिलांना हेरायचा, अशी माहिती समोर आली आहे.

Pune Bus Rape Case accused datta Gade
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा भर सभागृहात इशारा, म्हणाले 'कोणीही असो...'; सदस्यांचे टाळ्या वाजवून प्रोत्साहन

त्यामुळे पोलिसांना पुढील तपास कामासाठी आरोपी गाडे याचा मोबाइल पुरावा म्हणून हवा आहे. त्यामुळेच पोलीस यंत्रणेकडून आता आरोपीच्या मोबाइलचा शोध घेतला जात आहे. आरोपीचा मोबाइल सापडल्यास त्यामधून त्यांनी केलेले आणखी काही गुन्हे पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस त्याचा मोबाइलचा शोध घेत असल्याचे समजते.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Pune Bus Rape Case accused datta Gade
Anil Parab News : 'माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही', अनिल परब वक्तव्यावर ठाम

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com