Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : 'दिल्लीत कुठलंही भांडण सुटत नाही, छोट्या मोठ्या गोष्टी महाराष्ट्रातच...'; मोदी-शहांच्या 'त्या' मेसेजबद्दल फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले, शिंदेंना इशारा?

Fadnavis statement on Mahayuti internal disputes : एकनाथ शिंदे यांच्या वारंवार होणाऱ्या दिल्ली दौऱ्यांवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मोदी-शहांच्या संदेशाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. महायुतीतील अंतर्गत घडामोडींवर नव्या चर्चांना उधाण

Rashmi Mane

राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे बऱ्याचदा दिल्लीवारी करताना दिसतात. त्यांचा दिल्ली दौरा म्हटलं की, महायुतीतील अंतर्गत वादाची चर्चा सुरू होते. तसेच उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवारही हल्ली अनेकदा दिल्लीला जाताना दिसून आल्या आहेत.

त्यांच्याही दिल्ली दौऱ्यामागे महायुतीतील नाराजीचीच किनार असल्याचं बोललं जातं. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत महायुतीतील मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्या सातत्यानं होत असलेल्या दिल्ली दौऱ्यावरुन अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे.

महायुती सरकारमध्ये अनेकदा कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळतं. यात सरकारमधील मतभेद, जागावाटपाचे प्रश्न किंवा सत्ताधारी पक्षांतील अंतर्गत वाद यांसारख्या विषयांवर निर्णय नेमके कुठे घेतले जातात, याबाबत विरोधकांकडून अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यांबाबत महत्त्वाची टिप्पणी केली. त्यांनी दिल्लीत कुठलंही भांडण सुटत नाही आणि दिल्लीने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की, या छोट्या मोठ्या गोष्टी महाराष्ट्रातच तुम्हाला करायच्या आहेत. दिल्लीला इतकी कामं आहेत की, त्यात तिथून या गोष्टी एटरटेन करत नाही. हे जे काही असत ते महाराष्ट्रातच त्याचे निर्णय होतात. काही अडचणी आल्या तर आम्ही महाराष्ट्रातच सोडवतो असं फडणवीस यांनी सांगितलं.

फडणवीस म्हणाले, 'भाजप सर्व मोठा पक्ष आहे, त्यामुळे आमचा प्रेझेन्स हा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक नगरपालिकेत प्रत्येक जिल्हा परिषदेत, प्रत्येक महानगरपालिकेत आहे. आमचे जे दोन मित्र आहेत ते बघितलं तर काही जिल्ह्यांमध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे, काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे.

आम्ही सगळीकडे आहोत. आता तुम्ही बघा जवळपास दोन तृतीयांश ठिकाणी आम्ही अलायन्स पण करू शकलो. वन थर्ड ठिकाणी नाही आलो. भांडण झाली, ती सोडवली. आता सोबत असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महायुतीतील प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाची मदत घ्यावी लागते का? असा सवाल करण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी राज्यातील राजकीय आणि संघटनात्मक प्रश्न महाराष्ट्रातच निकाली काढले जातात, असे ठामपणे म्हटलं.

फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यांवरून विविध तर्क-वितर्क मांडले जात होते. त्यातून महत्त्वाचे निर्णय दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाच्या सल्ल्याने घेतले जात असल्याची चर्चा रंगत होती. मात्र, फडणवीस यांनी केलेल्या स्पष्ट वक्तव्यानंतर त्या चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT