Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Operation Tiger : ऑपरेशन टायगरमध्ये 'फडणवीस' फॅक्टरने कसं काम केलं? काय काय मदत केली? पहिल्यांदाच स्पष्टपणे सांगितलं

Shiv Sena Split News : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतरच शिवसेनेने खासदार फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर जोरकसपणे राबवले. त्यांच्या या ऑपरेशनला आता यश आले असून राज्यातील ठाकरेंच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Sachin Waghmare

Mumbai News : उद्धव ठाकरे यांच्या सहा खासदारांनी आठवडाभरापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गेल्या अनेक दिवसापासून ऑपरेशन टायगर राबविले जात असल्याचे सांगितले जात होते. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतरच शिवसेनेने खासदार फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर जोरकसपणे राबवले. त्यांच्या या ऑपरेशनला आता यश आले असून राज्यातील ठाकरेंच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ऑपरेशन टायगरबाबत सीएम देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले आहेत. त्यामध्ये कोण कोणती मदत केली याबाबत त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले.

यावेळी सीएम फडणवीस (Devendra fadnavis) यांना ऑपरेशन टायगरमध्ये 'फडणवीस' फॅक्टरने कसं काम केले असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी पहिल्यांदाच तर अशा प्रकारचे जे काही ऑपरेशन्स होतात त्यात काय घडलं, कोणी केलं, कसं केलं, या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. मी एवढंच म्हणेन की मित्रपक्षाने ऑपरेशन केले आणि मित्रपक्षाला आमचा योग्य तो पाठिंबा होता. त्यांना जी आवश्यक पडता पडली तेवढी मदत ही आमचा मित्रपक्ष म्हणून आम्ही केली, असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या खासदारांनी आम्हाला निधी मिळत नाही, त्यामुळे सत्ताधारी पक्षाबरोबर जाण्याशिवाय आम्हाला पर्याय उरलेला नाही. हे निधी न मिळण्याच काय कारण आहे? काय प्रकार आहे हा? अशी विचारणा त्यांना करण्यात आल्यानंतर फडणवीस म्हणाले, 'मला असं वाटतं की अनेक कारणांपैकी ते एक कारण असू शकतं. कारण निधीचा अर्थ केवळ निधी इतक्या पुरत मर्यादित नसतो. प्रोजेक्ट असतात, काही वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विषय असतात, काही सोशल विषय असतात, काही ऑफिसेस असतात अशा सगळ्या गोष्ट असतात.'

आपण जेव्हा सत्ता पक्षात असतो किंवा विरोधात असतो त्याच्यावर थोडा परिणाम होतोच. शेवटी सत्ता पक्षात असले तर आपल्या आमदार-खासदारांना थोडं जास्त मिळालं पाहिजे असा प्रयत्न असतो. पण हे एकमेव कारण आहे असं माझं मत नाही. मुळामध्ये जेव्हा नेतृत्व हे कॉन्फिडन्स इन्सपायर करणं बंद करत, त्यावेळी अशा प्रकारची परिस्थिती होते, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी 2029 साली अडीच वर्ष विरोधी पक्षात असताना सातत्याने आमच्या लोकांना घेऊन आम्ही भांडत राहिलो. विरोधी पक्ष म्हणून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरलो नाही. आम्ही एकही दिवस सरकारला झोपू दिले नाही, त्याचा आम्हाला त्याकाळी फायदा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT