Operation Tiger: राजकारण सोडेन, पण ठाकरेंची साथ नाही... ऑपरेशन टायगरच्या चर्चेत खासदार राजाभाऊ वाजेंचा मोठा दावा

Shiv Sena UBT MP Rajabhau Waje statement: खासदार राजाभाऊ वाजे यांची स्पष्टोक्ती, जोपर्यंत आहे तोपर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबतच राहणार!
Rajabhau Waje on Operation Tiger controversy
Rajabhau Waje on Operation Tiger controversySarkarnama
Published on
Updated on

Rajabhau Waje News: राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर ही चर्चा जोरात आहे. केंद्रातील सरकारकडून टीएमसी पक्षाचे खासदार फोडण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला टार्गेट करण्यात आले आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सात खासदार फोडण्याची मोहीम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. उद्धव ठाकरे समर्थकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. सध्या भाजपच्या माध्यमातून सुरू असलेल्या या राजकीय डावपेचांची जोरात चर्चा आहे.

Rajabhau Waje on Operation Tiger controversy
Operation Tiger Returns? : 'ऑपरेशन टायगर'चं मला काहीच माहिती नाही; शिंदे भेटीवर ठाकरेंच्या शिलेदाराचं ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, वाढवलं राजकीय टेन्शन

या पार्श्वभूमीवर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपल्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. माझे कोणत्याही खासदाराशी बोलणे झालेले नाही. त्यामुळे या संदर्भात कोण पक्ष सोडणार किंवा वेगळा गट स्थापन होणार असल्याबाबत काहीही माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Rajabhau Waje on Operation Tiger controversy
Shiv Sena UBT MPs Delhi : महाराष्ट्रात मध्यरात्रीनंतर मोठा राजकीय स्फोट? ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात? ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदे दिल्लीत?

यावेळी खासदार वाजे यांनी अतिशय वेगळे स्पष्टीकरण दिले आहे. मतदारांनी आपल्याला केंद्रातील सरकार विरोधात काम करण्याचा कौल दिला आहे. त्या दृष्टीने काम करण्यासाठी मतदारसंघातून कार्यकर्ते, मतदारांनी निवडून दिले आहे, हे विसरून चालणार नाही.

कोणत्याही सरकार विरोधात काम करताना अडचणी तर येणारच, हे निश्चित आहे. म्हणून त्याचा बाऊ करून कसे चालेल. मतदारांचा जो कौल आपल्याला मिळाला आहे त्याचे पालन करावे लागेल. अडचणी आल्या म्हणून पक्ष सोडायचा हे मनाला पटणारे नाही.

सध्या जे ऑपरेशन टायगर सुरू आहे त्याबाबत त्यांनी स्पष्ट शब्दात असहमती व्यक्त केली. असे होऊ लागले तर विरोधात कोणीच काम करायचे नाही असा संदेश यातून जात आहे. सरकारच्या विरोधात कामच करायचे नाही किंवा कोणी राहायचे नाही असा त्याचा अर्थ होईल.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. बैठकीला आम्ही चार खासदार उपस्थित होतो. उपस्थित खासदारांनी अनुपस्थिती बाबत वैद्यकीय तसेच विविध कारणे दिली होती. त्यामुळे यातील कोणी पक्ष सोडेल असे मला आज तरी वाटत नाही.

मी जोपर्यंत आहे तोपर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सोबत असेल. त्यादिवशी राजकारण सोडेल त्यानंतर माझ्या कुठे राहण्याला काही अर्थच असणार नाही. त्यामुळे उर्वरित सर्वच प्रश्न बाजूला पडतील.

ऑपरेशन टायगर या संदर्भात आपल्यापर्यंत कोणीही पोहोचलेले नाही. मी उद्या संसदीय समितीच्या बैठकीला दिल्लीला जात आहे. त्याचा अर्थ मी वेगळा काही निर्णय घेतला असे कोणी समजू नये, असेही खासदार वाजे यांनी स्पष्ट केले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com