Devendra Fadnavis criticised Rahul Gandhi over the Indore row Sarkarnama
महाराष्ट्र

Rahul Gandhi News : 'स्टँडअप कॉमेडियनचं काम करा, चांगला रोजगार मिळेल' फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

Devendra Fadnavis criticised Rahul Gandhi over the Indore row: इंदौरमधील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमातील पंतप्रधान मोदींच्या मिमिक्रीवरून वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका करत स्टँडअप कॉमेडीचा टोला लगावला.

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis criticised Rahul Gandhi : मध्य प्रदेशातील इंदौर येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करण्यात आली. या प्रकारावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप नेत्यांकडून राहुल गांधींवर टीका होत असतानाच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावरून राहुल गांधींना राजकारणाऐवजी स्टँडअप कॉमेडीमध्ये करिअर करावे, असा टोला लगावला आहे.

नागपुरात मिडियाशी बोलताना फडणवीस यांनी राहुल गांधींवर थेट निशाणा साधला. "मला असं वाटत आहे की, त्यांना आता हेच काम उरलं आहे. त्यांनी आता पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियनचं काम करावं. त्यांनी ते केल्यास त्यांना चांगला रोजगार मिळेल. इथे तर त्यांनी त्यांच्या पक्षाला बेरोजगार करून ठेवलं आहे," अशी टीका फडणवीस यांनी केली.

इंदौरच्या कार्यक्रमातील मिमिक्रीवरून वाद

राहुल गांधी यांच्या इंदूरमधील ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमात स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याच्या आणि वागण्याच्या शैलीची मिमिक्री केली. यावेळी राहुल गांधी मंचावर उपस्थित होते. या सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली.

‘छात्रो की गूंज’ या कार्यक्रमावर भाजपकडून टीका करण्यात आली. राहुल गांधींच्या या सादरीकरणात मोदी यांच्या दिवंगत आईंचा अपमान केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केला. त्यांनी काँग्रेसपक्ष हा विनोदवीरांचा पक्ष असल्याची टीका केली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, भाजप नेते प्रतुल शाहदेव, संबित पात्रा यां नेत्यांनी या कार्यक्रमात मोदी यांच्या दिवंगत आईंचा अपमान केल्याचा आरोप केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT