Rahul Gandhi news : वडिलांचं डोकं फोडलं, आरोपी मंत्र्यांमुळे मोकाट, मला मदत करा! निशूने आवाज उठवताच राहुल गांधींनी दिला आधार, दिल्लीत घमासान

Nishu Azad news, Rahul Gandhi, Nishu Azad father assault : जंतरमंतरवरील हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल; निशूच्या आक्रोशानंतर राहुल गांधींची तातडीची साथ, दिल्ली पोलिसांवर राजकीय दबावाचा आरोप.
Nishu Azad news, Rahul Gandhi support
Nishu Azad news, Rahul Gandhi supportSarkarnama
Published on
Updated on

Nishu Azad news : कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान निशू आझाद या आंदोलक तरुणीच्या वडिलांना बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपीचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. निशूच्या वडिलांचा हाफ मर्डर केला पण आपल्याला अटकही झाली नाही. मंत्री कपिल मिश्रा यांच्या फोननंतर आपल्याला पोलिसांनी सोडले. मिश्रा, चिराग पासवान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही आपले मोठे भाऊ असल्याचे आरोपी या व्हिडिओत म्हणाला आहे.

आरोपी स्वतंत्र भारद्वाज याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापले आहे. निशूचे वडील संजय कुमार या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. भारद्वाजच्या व्हिडिओवर संताप व्यक्त करत निशूने सोशल मीडियात व्हिडिओ पोस्ट करत थेट लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आपल्याला मदत करण्याचे आवाहन केले.

माझ्या वडिलांचे डोके फोडल्याचे त्याने कबुल केले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पण पोलीस काहीच करत नाहीत. दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही. आता राहुल गांधींकडूनच अपेक्षा आहे. मला न्याय मिळवून द्या, असे निशूने व्हिडिओमध्ये म्हटले होते. हा व्हिडिओ समोर येताच राहुल गांधी यांनीही लगेच मी तुझ्या सोबत असल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियात केली.

Nishu Azad news, Rahul Gandhi support
Supreme Court Shiv Sena case : सुप्रीम कोर्टात ठाकरेंची भिस्त असलेल्या मुद्दालाच शिंदेंच्या वकिलांनी हात घातलाय; गेमचेंजर ठरणार?

राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, निशू, घापरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तू आपला समाज आणि विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवत असल्याने तुला लक्ष्य केले जात आहे. अमित शहांची दिल्ली पोलीस एकीकडे विद्यार्थ्यांचा छळ करते आणि दुसरीकडे दलित मुलीच्या वडिलांचे डोके फोडणारा आरोपी मोकाट फिरत आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह, तुमचे आणि तुमच्या पक्षाच्या लोकांचे या आरोपींना संरक्षण काय आहे? निशू तू एकडी नाहीस. तुला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

Nishu Azad news, Rahul Gandhi support
DM Medha Roopam News : महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या वेतनातून 5 लाखांची भरपाई देण्याचे हायकोर्टाचे आदेश; चुकीचा गुन्हा दाखल करणं पडलं महागात

राहुल गांधी यांच्या या पोस्टनंतर दिल्लीतील राजकारण तापले असून कॉक्रोच जनता पार्टीही आक्रमक झाली आहे. पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास व आशुतोष रांका यांनी आज सकाळी थेट संसद मार्ग पोलीस ठाणे गाठले. भारद्वाजला अटक करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. यावेळी पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com