devendra fadnavis | narendra modi sarkarnama
महाराष्ट्र

Devendra fadnavis News : शरद पवारांचे 8 खासदार मोदींना भेटताच CM फडणवीसांचे मोठे वक्तव्य; म्हणाले,' कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी ...'

Devendra Fadnavis statement News : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ खासदारांनी सोमवारी सकाळीच पीएम मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Sachin Waghmare

Nagpur News : राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेलेल्या सहा खासदारांनी पीएम नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यात दोन्ही शिवसेनेकडून एकमेकांवर टीका केली जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ खासदारांनी सोमवारी सकाळीच पीएम मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच या भेटीबाबत सीएम देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ खासदारांनी सोमवारी भेट घेतली. या भेटीबाबत नागपुरातील प्रसार माध्यमाशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नसून संपूर्ण देशाचे असतात, त्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी भेटण्यात काहीही वावगे नाही, असे फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान हे देशाचे असतात ते कोणत्याही पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांना कोणी भेटले तर त्यामध्ये काही वावगे नाही. मी सुद्धा मुख्यमंत्री आहे. मला देखील अनेक विरोधी पक्षांचे लोक भेटतात आणि त्यांची कामे सांगतात. त्यामुळे या भेटीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचे कारण नाही. ते पंतप्रधानांना भेटायला जाणार असतील किंवा भेटले असतील तर ही चांगली गोष्ट आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना मांडली.

यावेळी त्यांनी तिरंगा रॅलीबाबत माहिती दिली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिरंगा रॅली होत आहे. देशभरातही तिरंगा रॅली होत आहे. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन आणि काल झालेला 9 ऑगस्ट करो या मरो, भारत छोडो या सप्ताहात संपूर्ण देशात तिरंगा रॅलीच्या माध्यमातून देशप्रेमाचं वातावरण तयार झालं पाहिजे, या दृष्टीने या रॅली काढण्यात आलेल्या आहेत, असेही सीएम फडणवीस म्हणाले.

राज्यात ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात येत आहेत. मुंबईच्या रॅलीमध्ये मी जाणार आहे, नंतर पुण्याच्या रॅलीमध्ये जाईल आणि 14 तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या रॅलीमध्ये जाणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी माध्यमाशी बोलताना दिली. नागपूरमधील नव्या भूसंपादनाच्या मुद्द्यावरही फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT