

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबाबत गेलेल्या सहा बंडखोर खासदारांनी घेतली. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ खासदारानी सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठे विधान केले आहे. डिलिमिटेशन विधयेक लोकसभेत मांडण्यात आलेले नाही. त्याबाबत आताच चर्चा करणे योग्य नाही. त्यामुळे खासदार भेटीचा संबंध डीलिमिटेशनशी जोडू नका, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ खासदारांच्या शिष्टमंडळाने सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी या आठ खासदारांच्या मतदारसंघातील समस्या, पाऊस व विकास कामाबाबत चर्चा झाली. या खासदारांच्या समस्या पीएम मोदी यांनी जाणून घेतल्या. त्यासोबतच यावेळी शेतकरी कर्जमाफीतील अनियमतेबाबत यावेळी चर्चा झाली. त्यामुळे केंद्र सरकार याबाबत काय पावले उचलणार? याकडे लक्ष लागले असल्याचे खासदार कोल्हे यावेळी म्हणाले.
पुणे-नाशिक रेल्वेच्या मुद्द्यावर यावेळी पीएम मोदी यांचे लक्ष वेधले. त्यासोबतच शेतकरी कर्जमाफी, नमामि चंद्रभागाबाबत यावेळी चर्चा झाली. यावेळी आठही लोकसभा मतदारसंघातील प्रश्नाबाबत चर्चा केली. त्यासोबतच येत्या काळात प्रत्येक जिल्हयात कॅन्सर रुग्णालय व्हावे, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी या भेटीवेळी केली.
त्यासोबतच यावेळी पत्रकारांनी डिलिमिटेशन विधयेकाला पाठींबा देणार आहात का? अशी विचारणा केली असता खासदार कोल्हे म्हणाले,'डिलिमिटेशन विधयेक लोकसभेत मांडण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यावर बोलणे आताच उचित ठरणार नाही. त्यामुळे खासदार भेटीचा संबंध डिलिमिटेशनशी जोडू नका, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.