Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार, देवेंद्र फडणवीस थेट बोलले, 'त्यांनी सुनेत्रावहिनींना...'

Baramati By-Election Congress Candidate : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

प्रकाश लिमये

Devendra Fadnavis News : अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेली बारामती विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध होऊ देण्यास काँग्रेसने  नकार दिला असून त्याठिकाणी आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसला जनभावनेची थोडीतरी कदर असेल आणि जनतेचे मत काय आहे,  हे जर काँग्रेसला लक्षात येणार असेल तर ते उमेदवारी परत घेऊन सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा रोड येथे व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहिसर काशीगाव या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे मंगळवारी (ता.७) लोकार्पण झाले. त्यावेळी प्रसारमाध्यमाध्यमांशी ते बोलत होते.

बारामती पोटनिवडणुकी संदर्भात प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. जनामताच्या विरोधात जाणे कोणत्याही पक्षाच्या हिताचे नसते. सुनेत्राताईंना बिनविरोध निवडून द्यावे ही जनभावना आहे. काँग्रेस जनभावनेशी  खेळण्याचे काम करणार नाही अशी अपेक्षा करतो.

माघारीसाठी काँग्रेसची अट

काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी बारामती पोटनिवडणुकीमधीन माघार घेण्यासाठी अट घातली आहे. ते म्हणाले, अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करावा. त्यांनी गुन्हा दाखल केला तर मी लगेच माघार घेईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT