Baramati bypoll update : काँग्रेसने उमेदवार द्यायला नको होता! प्रफुल्ल पटेलांचा बारामतीतून थेट प्रहार; पोटनिवडणुकीबाबत केला मोठा दावा

Sunetra Pawar candidate : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी बारामती पोटनिवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे.
Praful Patel
Praful PatelSarkarnama
Published on
Updated on

Mumbai news : आगामी काळात होत असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार मैदानात उतरवला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच काँग्रेस उमेदवाराच्या एन्ट्रीने ही निवडणूक बिनविरोध हॊणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी बारामती पोटनिवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे.

त्यामुळे निवडणूक आता बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट करीत या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर बारामतीमध्ये प्रसार माध्यमाशी संवाद साधताना प्रफुल पटेल म्हणाले की, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार द्यायला नको होता.

Praful Patel
Harshwardhan Sapkal News: बारामती पोटनिवडणुकीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या उमेदवारानं अर्ज भरला; पण सपकाळांची दांडी..? कारण आलं समोर

खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर (Congress) केलेल्या टीकेमुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत पार्थ पवारांनी थेट काँग्रेसच्या कार्यपद्धतीवरच निशाणा साधला आहे. त्यासोबतच खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. या टीकेबाबत पत्रकारांनी प्रफुल पटेल यांना विचारणा केली असता या विषयावर बोलणे त्यांनी टाळले.

Praful Patel
Harshwardhan Sapkal News: बारामती पोटनिवडणुकीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या उमेदवारानं अर्ज भरला; पण सपकाळांची दांडी..? कारण आलं समोर

माझं कुणाशी बोलणं झालं नाही. काँग्रेसला (त्यांना) कळायला पाहिजे काय करायचं ते. त्यांच्या (काँग्रेसच्या) राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला नाही माहिती. सगळे मोठे लोक आहेत, सर्वांना माहिती आहे काय चाललंय. त्यांनी (काँग्रेसने) विचार केला असेल तर करु द्या. पण त्यांना (काँग्रेसला) नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल, अशा शब्दात पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत थेट इशाराच दिला आहे.

Praful Patel
Baramati Bypoll : डाऊनफॉल सुरू! पार्थ पवारांचा काँग्रेसला सूचक इशारा

पार्थ पवार यांच्या टिकेनंतर राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच आता सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यामुळे वातावारण चांगलेच तापले आहे.

Praful Patel
Harshwardhan Sapkal News: बारामती पोटनिवडणुकीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या उमेदवारानं अर्ज भरला; पण सपकाळांची दांडी..? कारण आलं समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com