Harshwardhan Sapkal News: बारामती पोटनिवडणुकीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या उमेदवारानं अर्ज भरला; पण सपकाळांची दांडी..? कारण आलं समोर

Congress Baramati Election News: महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून आकाश मोरे यांनीही बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. पण यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गैरहजर होते.
Sunetra Pawar Harshwadhan Sapkal Aakash More .jpg
Sunetra Pawar Harshwadhan Sapkal Aakash More .jpgSarkarnama
Published on
Updated on

Baramati News: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. सुरुवातीला बारामती पोटनिवडणुकीत 'बिनविरोध'चं वारं वाहू लागलं होतं. त्या अनुषंगानं महायुती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. पण बिनविरोधची शक्यता मावळल्यानंतर आता बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी अपडेट समोर आली आहे.

महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी(ता.6 एप्रिल) पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून आकाश मोरे यांनीही बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. पण यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गैरहजर होते. यामुळे त्यांनी मोरेंच्या अर्ज दाखल करतेवेळी दांडी मारल्याची चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे पहिल्या दिवसापासून आग्रही भूमिकेत होते. त्यांनी महाविकास आघाडीपेक्षाही काँग्रेससाठी बारामतीत उमेदवार देणं किती महत्त्वाचं आहे,हे दिल्लीतही हायकमांडला पटवून दिल्याची माहितीही समोर आली होती. अखेर नाही-हो करत काँग्रेसनं आकाश मोरेंसारखा राजकीय अनुभव असलेला तगडा व आक्रमक नेता मैदानात उतरवला. पण याचदरम्यान, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मोरेंच्या उमेदवारी अर्ज भरताना गैरहजर राहिले.

काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केल्यानं आता बारामतीची रणधुमाळी रंगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण हर्षवर्धन सपकाळ उमेदवार आकाश मोरे यांच्या अर्ज दाखल करताना अनुपस्थित राहण्यामागचं कारण समोर आलं आहे. सपकाळ हे सध्या केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय आणि प्रचंड व्यस्त असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यासह काँग्रेसकडून महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी केरळ,तमिळनाडूत मैदानात उतरवले आहेत.

Sunetra Pawar Harshwadhan Sapkal Aakash More .jpg
Baramati Bypoll : पोटनिवडणुकीवर पार्थ पवार पहिल्यांदाच बोलले अन् दिला करारा जवाब; म्हणाले, काय त्रास होईल, ते दिसेल...

काँग्रेस पक्षाने रविवारी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आकाश मोरे यांचे नाव जाहीर केले होते. दिल्लीतून ही घोषणा होण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केल्याची चर्चा होती. मात्र, काँग्रेसकडून मोरे यांना उमेदवारी दिल्यानं सुनेत्रा पवार यांचा बिनविरोधसाठीचा प्रयत्न निष्फळ ठरल्याचं बोललं जात होतं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जायचं असल्यानं त्यांचा बारामती दौरा रद्द झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हर्षवर्धन सपकाळ यांचा बारामती दौरा रद्द झाल्यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सपकाळांनी ऐनवेळी बारामतीमध्ये आकाश मोरेंच्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी गैरहजर राहिल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सपकाळांच्या अनुपस्थितीमागं सुनेत्रा पवार यांनी काल केलेला फोन कॉल कारण आहे का, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

Sunetra Pawar Harshwadhan Sapkal Aakash More .jpg
Congress Rules : काँग्रेसमध्ये निष्ठावंतानाच पदं मिळणार! आता 'या' निकषांमध्ये बसत असेल तरच पद वाटपांबाबत होणार विचार

हाकेंची माघार...

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्याची की नाही? या संदर्भात आपली भूमिका जाहीर केली आहे.यावेळी ते म्हणाले, बारामतीमध्ये सहानुभूतीची लाट आहे. ही वस्तूस्थिती असताना सुद्धा काही प्रश्नांकडे मला लक्ष वेधून घ्यायचं होतं. मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही. माझी कुठलीही राजकीय चाल नाही. मी एक ओबीसी आंदोलक असून भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी मी नेहमीच आवाज उठवतो. तशी मला स्पेस मिळाली आहे असंही हाके यांनी स्पष्टपणे सांगितलं.

हाके म्हणाले, या निवडणुकीच्या निमित्ताने काही आक्रस्ताळेपणे, विद्रोही भावना काही गोष्टी आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करत होतो. भरणेमामांनी मला सांगितलं. महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांचे, सुनेत्राताई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विनंती केली. त्यापुढे उदय सामंत, धनंजय मुंडे या सर्वांनी मला कॉल केले. त्यानंतर मी विचार केला, असं लक्ष्मण हाके म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com