Nitesh Rane And Devndra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मदरशांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंचे कान फडणवीसांनी टोचले; म्हणाले, 'मी जे बोलतो ते अधिकृत, त्यांचे विधान...'

Devendra Fadnavis On Nitesh Rane hindu-muslim divisive politics : तळकोकणातील नेते तथा भाजप मंत्री नितेश राणे यांची पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य समोर येत असतानाच फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरणात दिली आहे.

Aslam Shanedivan

  1. देवेंद्र फडणीस यांनी एका कार्यक्रमात नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली.

  2. मदरशांबाबत केलेल्या विधानांवरून राजकीय वाद निर्माण झाला असून त्यावर मुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

  3. वारंवार वातावरण तापवणाऱ्या वक्तव्यांबाबत संयम राखण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिल्याचे मानले जात आहे.

Mumbai News : मालेगाव महापालिकेतील उपमहापौर शान-ए-हिंद यांनी लावलेला टिपू सुलतान फोटोवरून राज्यभरात वाद उफाळल्यानंतर पुन्हा एकदा नवा वाद रंगला. येथेच नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समोर आल्याने हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत महापालिका आयुक्तांच्या दालनात हनुमान चालिसा वाचली होती. यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण तंग झाले असतानाच भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनीन देखील काही दिवसांपूर्वी मदरशांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते.

तसेच राज्यातील मदरशांत दहशतवादी तयार करतात म्हणत सर्व मदरसे बंद करू, तोडून टाकू असे म्हटले होते. ज्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. यानंतर राज्यातील मुस्लिम समाज हा नितेश राणे यांच्यासारख्यांना मुख्यमंत्री अभय का देतात? त्यांना का मोकळं सोडतात, त्यांना का समज देत नाहीत असा सवाल करताना दिसत आहेत. यावरून आता फडणवीस यांनी थेट उत्तर देताना नितेश राणेंचे कान टोचले आहे.

मालेगाव महापालिकेतील विद्युत अधीक्षकांच्या दालनात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभर हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. मालेगाव महापालिका आयुक्तांच्या दालनात तर हनुमान चालिसा वाचण्यात आली होती. तसेच या मुस्लिमांना आताच आवर घाला अन्यथा... असा इशारा देण्यात आला होता. यानंतर भर अधिवेशनात काँग्रेसचे नेते आणि मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख यांनी यावर प्रतिक्रिया देताना आता बस्स झालं हिंदू-मुस्लिम, राज्यात इतरही मुद्दे मोठे असल्याचे म्हटले होते.

यावरच प्रतिक्रिया देताना, नितेश राणे यांनी (25 फेब्रुवारी) मालेगावमधील घटनेवर भाष्य करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी नमाज पढायला तुमच्या मशिदी आता कमी पडत आहे का? असा सवाल करत थेट हल्लाबोल केला होता. तर राज्यातील मदरसे हे दहशतवाद्यांचे अड्डे झाले असून सगळे मदरसे बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री ‍यांच्याकडे करणार आहे.

निवडणुकीआधी हे लोक जय भीम जय भीम करतात मात्र निवडून आल्यावर बाबासाहेबांना विसरतात. संविधानात नमाज पठणाला कुठं मान्यता आहे. नमाज पठणाला मशिदी काय बंद होत्या का? आता जर हे नमाज पठण करत असतील तर 'आम्ही देखील गीता वाचायला सुरूवात करू, मग या हिरव्या सापांनी बोलू नये. मदरसे हवेतच कशाला, मदरसे दहशतवादी चालवतात. यामुळे आम्ही शाळांमध्ये भगवत गीता शिकवू, मदरशांचे लाड कशाला करायचे? असे म्हटले होते.

यानंतर आता राज्यातील मुस्लिम समाजासह विरोधक नितेश राणे यांच्यासारख्यांविरोधात संतप्त सवाल करातान दिसत आहेत. नितेश राणेंसह इतर काही नेते सर्वांना एकाच चौकटीत बसवणारी विधाने करून सतत वातावरण पेटवतं आहेत. मुस्लिम समाजाला हिनवणारी वक्तव्य करत त्यांचा उल्लेख हिरव्या सापांनी असा करत असतात. त्यांच्या या वक्तव्यांना मुख्यमंत्री का अभय देतात? राणे यांच्यासारख्यांना आवर का घालत नाही? की मुख्यमंत्र्यांची भूमिका ही, ‘करा जितकी घाण करायची आहे, करा जितका गोंधळ घालायचा आहे,’ अशीच आहे? सवाल फडणवीस यांना केला जात आहे. असाच प्रश्न एका खासगी वृत्त वाहिनीनं फडणवीस यांना विचारला होता.

ज्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी उत्तर देत फक्त नितेश राणेच नाही तर भाजपसह राष्ट्रवादीतील काही नेत्यांचे कान टोचले आहेत. जे हिंदू-मुस्लिम करताना दिसतात. फडणवीस यांनी, मी पक्षाचा सर्वोच्च नेता असून माझी जी भूमिका आहे तीच भारतीय जनता पक्षाची नीती आहे. त्यामुळे मी जे बोलतो, ती भाजपची अधिकृत भूमिका असते. यामुळे इतर कोणी काही बोलले, तर ते त्यांचे वैयक्तिक मत असते.

नितेश राणे यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास,ते कधी कधी बोलताना काही गोष्टी जास्त बोलून जातात. अशा वेळी त्यांना एकच सांगतो की, ‘तुमची ही विधानं योग्य नाहीत, असे बोलणे टाळा’. मात्र मदरशांबाबत त्यांनी जे विधान केलीत, ते त्या काळातील परिस्थितीच्या संदर्भात होती. त्या वेळी काही ठिकाणी बाहेरून निधी येत असल्याची माहिती होती आणि काही गोष्टी शिकवल्या जात असल्याबाबतही आक्षेप होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ती वक्तव्य केली असावीत. यामुळे या विधानाकडे एकट्या घटनेप्रमाणे न पाहता, संपूर्ण परिस्थितीच्या अनुशंगाने पाहणे आवश्यक असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.

FAQs :

1. नितेश राणे यांनी नेमके काय वक्तव्य केले होते?
मदरशांबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केले होते, ज्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला.

2. देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी विभाजनकारी विधानांवर अप्रत्यक्षपणे कान टोचत संयमाची भूमिका मांडली.

3. या वक्तव्यामुळे कोणती प्रतिक्रिया उमटली?
राजकीय वर्तुळात चर्चा आणि टीका सुरू झाली आहे.

4. भाजपमध्ये अंतर्गत मतभेद आहेत का?
अधिकृतरीत्या मतभेद मान्य नाहीत; मात्र या प्रकरणामुळे चर्चा रंगली आहे.

5. पुढे या वादाचा काय परिणाम होऊ शकतो?
राजकीय वातावरणावर आणि पक्षाच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT