Mumbai News : विरोधकांकडून गेल्या चार दिवसापासून सातत्याने निवडणूक आयोगावर विविध आरोप केले जात आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधक सतत मतचोरीचा जप करत आहेत, पण प्रत्यक्षात यांचा मेंदूच चोरीला गेलेला आहे. त्यामुळे विरोधकांचा मेंदू परत आणण्यासाठी समिती नेमण्याची मागणी करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसकडून निवडणूक आयोगावर केल्या जाणाऱ्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. " तीन निवडणूक आयुक्तांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे बनावट नरेटिव्ह पूर्णपणे उध्वस्त झाले आहे, असा घणाघाती दावा त्यांनी केला. हे सतत मतचोरीचा जप करत आहेत, पण प्रत्यक्षात यांचा मेंदूच चोरीला गेलेला आहे, असा हल्लाबोलही यावेळी फडणवीस यांनी केला.
विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर खोचक टोला लगावत फडणवीस म्हणाले, "हे सतत मतचोरीचा जप करत आहेत, पण प्रत्यक्षात यांचा मेंदूच चोरीला गेलेला आहे. विरोधकांचा चोरीला गेलेला किंवा गहाण ठेवलेला मेंदू परत आणता येईल का? यासाठी एखादी चौकशी समिती किंवा व्यवस्था करता येईल का, अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार आहे."
पश्चिम बंगालचे उदाहरण देत ते म्हणाले की, एसआयआर (SIR) अंतर्गत ज्या १५ मतदारसंघांत नावे कमी झाली, तिथे भाजपचे मतदार जास्त असतानाही तृणमूल काँग्रेस कशी निवडून आली? त्यामुळे शहरात असो वा गावात, विरोधकांचे हे आरोप पूर्णपणे फोल ठरले आहेत. या १५ मतदारसंघात एसआयआर केल्यानंतर मतदार संख्या घटली होती, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच एसआयआर करीत असताना देशातील सर्व पक्षांना बीएलओ नेमण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बीएलओ नेमल्यास कोणतीच अडचण येणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.