Karad South voter list : कराड मतदारसंघातील दुबार नावावरून पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल; निवडणूक आयोगाला धारेवर धरत केले गंभीर आरोप

Karad South voter list News : दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघात 56 हजार नावे दुबार आढळून आली असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Karad News : दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघात 3 लाख 15 हजार एकूण मतदार आहेत. त्यापैकी जवळपास 56 हजार नावे दुबार होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माझ्या मतदारसंघातील जवळपास 48 हजार दुबार, तिबार नोंदी आढळून आल्या होत्या. ही संशयास्पद नावे त्यावेळी वगळण्यात आली होती. दक्षिण कराड मतदारसंघात 28 हजार मतदार दुबार आढळून आले. तर माझ्या मतदारसंघा शेजारी असलेल्या कराड उत्तर, इस्लामपूर, शिराळा, पाटण आणि पलूस-कडेगाव या पाच विधानसभा मतदारसंघातील जवळपास 27 हजार नावे दुबार माझ्या मतदारसंघात आली आहेत. भोगोलिक दृष्ट्या हे पाच मतदारसंघ जवळचे आहेत. त्यामुळे एकूण 56 हजार दुबार मतदार दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघात आढळून आली असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.

विधानसभा निवडणुकांमधील मतदार याद्यांमधील त्रुटी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या एकतर्फी आणि निष्काळजी कामकाजावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर आरोप केले. 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर डुप्लिकेट नावे दिसत आहेत. दक्षिण कराड मतदारसंघात एकूण 56 हजार मतदार दुबार आढळून आली आहेत. त्याचा निवडणुकीत प्रभाव दिसून आला आहे. त्यामुळेच याठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ही दुबार नावे आता वगळली पाहिजे. ही सर्व नावे वगळण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

दक्षिण कराड मतदारसंघासोबतच सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातही दुबार मतदार आढळून आली आहेत. त्यासोबतच त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नागपूरला गेले होते. त्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यावेळी त्यांनी दहा टक्के मतदार वाढवा, असे आदेश दिले होते, त्याबाबतचे पुरावे लवकरच सादर करेन, असेही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Prithviraj Chavan
Maharashtra Congress News: मोठी बातमी! 'होय, दुबार मतदारयादीत माझं नाव...'; काँग्रेस नेत्याचा धक्कादायक खुलासा

त्यासोबतच दिल्लीतील जंतर मंतरवर सीजेपीचे आंदोलन नुकतेच पार पडले होते. या आंदोलनाला गुंडाळण्यासाठी पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार, गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? असा सवाल त्यांनी केला. आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले होते, असा आरोप त्यांनी यावेळी केला. या सर्व प्रकाराला हे दोघेजणच जबाबदार असल्याने त्यांनी संसदेत यायचे टाळले, असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com