Mumbai News : राज्याच्या राजकारणात गेल्या आठ ते दहा दिवसात जोरदार घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे यांची सेना सोडून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला तर दुसरीकडे दोनच दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेचे उपसभापती झाले. मात्र, या सर्व वेगवान घडामोडी मागे कोण? याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. त्यातच सचिन अहिरांच्या पक्षांतरामागच्या या सर्व घडामोडीत सीएम देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी करीत महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे समजते. त्यांनीच अहिरांच्या उपसभापतीपदासाठी एकनाथ शिंदे यांचे मन वळवल्याचे पुढे आले आहे.
माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय असलेल्या सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेसेनेची साथ सोडत शिवसेनेचा भगवा हाती धरण्यासाठी आणि विधान परिषदेचे उपसभापतीपद स्वीकारण्यास राजी करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वपूर्ण मानली जात आहे.
ठाकरेंचे विश्वासू असलेले सचिन अहिर (Sachin ahir) हे ठाकरेंची साथ सोडण्यासाठी इतक्या लवकर तयार होतील. यावर कोणाचा विश्वास बसत नाही. ठाकरे सेनेचे नेते सचिन अहिर यांच्या तरुण वयाचा आणि राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत त्यांना पक्ष बदलण्यासाठी सीएम फडणवीस यांनी प्रोत्साहित केल्याचे समजते. अहिर हे मृदूभाषी आणि अनुभवी असल्याने, पक्षातील इतर कोणत्याही आमदाराची निवड करण्याऐवजी त्यांनाच विधान परिषदेचे उपसभापतीपद दिले जावे, यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचेही मन वळवले. फडणवीस यांच्या या प्रयत्नांमुळेच सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली, असे वृत्त एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
ऑपरेशन टायगरची जबाबदारी होती या दोन उद्योजकांवर ?
उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील लोकसभेच्या सहा खासदारांना शिवसेना पक्षात ओढण्याच्या 'ऑपरेशन टायगर'ची जबाबदारी उत्तर भारतातील शस्त्र-व्यापारी आणि उद्योजक अभिषेक वर्मा यांच्यावर सोपवण्यात आली होती. या मोहिमेचे काम अत्यंत आव्हानात्मक असल्याने ती यशस्वी करण्यासाठी संबंधित व्यक्तींनी आंध्र प्रदेशातील उद्योजक आणि वायएसआर काँग्रेसचे राज्यसभा खासदार अल्ला अयोध्या रामी रेड्डी यांनाही यात सामील करून घेतले, असेही वृत्त इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
या ऑपरेशन टायगरचे बक्षिस म्हणून अभिषेक वर्मा यांना राज्यसभेवर निवड केली जाणार आहे. तर अल्ला अयोध्या रामी रेड्डी यांना आशियातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत एक फायदेशीर कंत्राट मिळवून देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.