Eknath Shinde vs Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; सर्वात विश्वासू आमदाराला फोडले, थेट उपसभापती पदासाठी भरला अर्ज

Eknath Shinde news, Sachin Ahir news, Uddhav Thackeray latest news : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदारांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena political crisis : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वीच सहा खासदारांनी शिवसेनेत आणत त्यांनी ऑपरेशन टायगर यशस्वी करून दाखविले होते. त्यानंतर आमदारही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या नेत्यांकडून सांगितले जात होते. त्याची सुरूवात मंगळवारपासून झाली आहे.

मुंबईतील विधानपरिषदेचे आमदार आणि ठाकरेंचे विश्वासू नेते सचिन अहिर यांनी मंगळवारी शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. ठाकरेंना हा मुंबईत मोठा झटका बसला आहे. अहिर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि महायुतीतील अन्य नेत्यांच्या उपस्थित अर्ज दाखल केला.

एकनाथ शिंदे यांच्याकडून धक्कातंत्राचा वापर करण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतील काही नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, मंगळवारी अचानक शिंदे यांनी सचिन अहिर यांना समोर आणत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनाही जोरदार धक्का बसला आहे.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Tamil Nadu political news : आमदारांचे धडाधड राजीनामे अन् सर्वच मित्रपक्ष सत्तेत; मातब्बर विरोधकांना जोरदार झटके...

शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितले की, 'सचिन अहिर हे शिवसेनेचे आहेत, आता ते शिवसेनेतच आले आहेत.' त्यामुळे सचिन अहिर हे शिवसेनेत आले असल्याचे स्पष्ट झाले असून असून त्यांनी शिवसेनेचा उमेदवार म्हणूनच अर्ज दाखल केल्याचेही सांगितले जात आहे.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
पतीने सोडली बड्या नेत्याची साथ, IAS पत्नीची स्वेच्छानिवृत्ती घेत राजकारणात उडी

सचिन अहिर हे ठाकरे कुटुंबाचे विश्वासू नेते मानले जात होते. प्रामुख्याने मुंबईतील वरळी भागासह दलित मतदारांमध्ये अहिर यांचा दबदबा आहे. आता त्यांनीही ठाकरेंची साथ सोडली आहे. शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर सुरू असल्याचे स्पष्ट संकेत पुन्हा एकदा देण्यात आले आहेत. आता ठाकरेंचे विधानपरिषदेतील अन्य आमदार काय भूमिका घेणार, याबाबतही उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com