Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Video Devendra Fadnavis : फडणवीसांनी ठणकावलं, 'उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर चालले हे तर विरोधकांचं खोटं कथानक'

Devendra Fadnavis Said opponent spreading false narratives : 'गेल इंडिया'चा उद्योग गेल्याचे सांगितले गेले. आपण त्यांना कोणत्याही सवलती दिल्या नव्हत्या. तशी बोलणी झाली नव्हती. त्यांची इतर सात आठ राज्यात चाचपणी केली, असे फडणवीस म्हणाले.

Roshan More

Devendra Fadnavis News : मुंबईच्या हबमधून एकही उद्योग बाहेर गेला नाही. मुंबईतून एकही डायमंड व्यापारी बाहेर जाणार नाही. सुरतमधून फक्त 12 टक्के हिऱ्यांची निर्याद होते तर मुंबईतून 75 टक्के. उद्योगधंदे महाराष्ट्रा बाहेर गेले नाहीत. उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर चालले हे तर विरोधकांचं खोटं कथानक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं.

'गेल इंडिया'चा उद्योग गेल्याचे सांगितले गेले. आपण त्यांना कोणत्याही सवलती दिल्या नव्हत्या. तशी बोलणी झाली नव्हती. त्यांची इतर सात आठ राज्यात चाचपणी केली. त्यांची मध्यप्रदेश सरकारशी बोलणी सुरू आहे. मात्र, त्यांची गुंतवणुक गेली असे नाही. त्यांच्या दुसऱ्या प्रोजक्टचा प्रस्ताव आपल्याकडे आहे, असे देखील उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री Eknath Shinde दाओसला गेले तिथून त्यांनी मोठी गुंतवणूक आणली. एक लाख 37 कोटीचे एमओयू आपण केले. यातील 80 टक्के एमओयूवर कारवाई झाली आहे. गुंतवणुक प्रगतीपथावर आहे. जानेवारी 2024 मध्ये दोन लाख 98 हजार 791 कोटी रुपयांचे 23 करार आपण केले आहेत. गुंतवणुक फक्त कागदावर नाहीये तर ती प्रत्यक्षात येत आहे.

दोन लाख नोकऱ्या

दोन वर्षांच्या काळात एक लाख जणांना सरकारी नोकरी देण्याचा विक्रम या सरकारने केलाय. हे सगळे करताना नरेटिव्ह तयार होतात. साधारणपणे आपण 70 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. त्यात एकही पेपर फुटीची घटना घडली नाही, असे फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT