Sanjay Shirsat News : राजकारणापलीकडची मैत्री! काँग्रेसच्या 'त्या' आमदाराची शिंदे गटाच्या नेत्याकडून विचारपूस

Maharashtra Monsoon Session : काँग्रेसचे आमदार हे विधानभवनात व्हिलचेअरवरून आले. शिवाय यावेळी ती पायऱ्यांवरून येताना लंगडी घालत आल्याचे पाहायला मिळाले.
Sanjay Shirsat And Amin Patel
Sanjay Shirsat And Amin Patel Sarkarnama

Mumbai News : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनकाळात सत्ताधारी- विरोधकांमध्ये खडाजंगी अनेकदा पाहायला मिळाली. तर काहीवेळा अनेक आश्चर्यचकीत करणारे प्रसंगही घडले. यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे - फडणवीस, अजित पवार - जयंत पाटील यांच्या भेटी अन् कोपरखळ्यांनी वारं बदललं आहे.

अशातच आता आणखी एक राजकारणापलीकडच्या मैत्रीचं दर्शन झालं. काँग्रेसचे(Congress) मुंबादेवी मतदारसंघाचे आमदार अमीन पटेल यांच्या पायाला दुखापत झाली आहे. अशा परिस्थितीही त्यांनी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी व्हीलचेअरवरून विधानभवनात एन्ट्री केली.

काँग्रेसचे आमदार अमीन पटेल हे विधानभवनात व्हिलचेअरवरून आले. शिवाय यावेळी ती पायऱ्यांवरून येताना लंगडी घालत आल्याचे पाहायला मिळाले. पटेल यांना अशा अवस्थेत विधानभवनात आल्याचं पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. शिवाय ते विधान भवनाच्या पायऱ्या चढताना अक्षरशः लंगडी घालत वरती चढले.

दरम्यान ते वरती आले असता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना पटेल व्हिलचेअरवर बसल्याचं दिसतात त्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. शिवाय यावेळी त्यांनी पायाला कशी दुखापत झाली आता तब्येत कशी आहे याची विचारपूस केली. त्यामुळे राजकारणात एकमेकांच्या विरोधी भूमिका असले तरीही मैत्रीच्या नात्याने शिरसाटांनी पटेल यांची आपुलकीने विचारपूस केल्याचा पाहायला मिळालं.

Sanjay Shirsat And Amin Patel
Eknath Khadse : खडसे कोसळले पण.. कार्यकर्त्यांनी सावरले !

पटेल व्हिलचेअरवरून तर खडसे..

काँग्रेसचे आमदार अमीन पटेल हे विधानभवनात व्हिलचेअरवरून आले. शिवाय यावेळी ती पायऱ्यांवरून येताना लंगडी घालत आल्याचे पाहायला मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सध्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असणारे एकनाथ खडसे हे देखील आज विधानभवनाच्या पायऱ्या चढत असताना तोल गेल्यामुळे अडखळले.

त्यामुळे एकूणच तब्येतीची काळजी न करता विधानसभेत हजेरी लावण्यासाठी नेत्यांची किती धावपळ आहे हे पाहायला मिळाले. मग ते स्वखुशीने विधानसभेत आले की विधान परिषदेची निवडणूक जवळ आल्यामुळे मतांची जुळवाजवळ करण्यासाठी वरिष्ठांनी त्यांना विधान भवनात यायच्या आधीच दिले याबाबतच्या चर्चा सुरू आहेत.

Sanjay Shirsat And Amin Patel
Video Manohar BhideGuruji : मनोहर भिडे धार्मिक, आतंकवादी, शरद पवारांच्या शिलेदाराची कडक शब्दात टीका !

आप नहीं काँग्रेस गिरनी चाहिए थी...

दरम्यान आज आमदार अमीन पटेल व्लिचेअरवरून विधानभवनात येत असताना रस्त्यात मध्येच त्यांना भाजपच्या आमदार मनिषा चौधरी या भेटल्या यावेळी चौधरी यांनी पटेल यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी बोलताना पटेल यांनी मै गिर गया था असं त्यांना सांगितलं. यावर चौधरी यांनी आप नही काँग्रेस गिरनी चाहिये थी अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यामुळे दोघांनी एकमेकांना टाळी देत हास्यविनोद केल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Sanjay Shirsat And Amin Patel
Raju Shetti : चळवळ टिकवण्याचं शेट्टींसमोर आव्हान, सततच्या बदलत्या राजकीय भूमिकेमुळे शिलेदार दुरावले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com