Congress Vs Bjp : 'केंद्रातील पप्पूप्रमाणे हा तर त्यांचा बालिशपणा', पुण्यात घाटे-शिंदे वाद पेटला!

Arvind Shinde Vs Dheeraj Ghate : अरविंद शिंदे हे पुण्यातील शहराध्यक्ष आहेत मात्र ज्या पद्धतीने केंद्रात पप्पू बालिश चाळे करतात. तोच बालिशपणा अरविंद शिंदे यांनी पुण्यात केला आहे.
Arvind Shinde - Dheeraj Ghate
Arvind Shinde - Dheeraj GhateSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शहरातील मध्यवर्ती भागात धीरज घाटे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करणारे फ्लेक्स लावले आहेत. भाजपकडून लावण्यात आलेल्या या फ्लेक्स मध्ये राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर फुली मारण्यात आली आहे.तसेच या पोस्टर मध्ये राहुल गांधींच्या बाजूला स्वामी विवेकानंद यांच्या फोटो लावण्यात आला आहे.

याखाली कॅप्शन मध्ये 'खबरदार हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईल' असा मजकूर छापण्यात आला आहे. याच पोस्टरवरून घाटे यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी बुधवारी गंभीर विधान केले होते. त्यानंतर आता भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी देखील शिंदेंना उत्तर दिलं आहे.

भाजप शहराध्यक्षांनी जे पोस्टर लावले आहेत ते स्वतः पोलिस संरक्षण घेऊन फिरत असतात. त्यांचा मर्डर होणार होता. शहरामध्ये एकटे फिरू शकत देखील नाही. 'तू कधी मरू शकशील हे माहित नाही, कारण तुझी कर्म तशी आहेत. कर्म तुम्ही कराल ते तुम्हाला भोगावं लागतं' अशी टीका काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली होती.

याबाबत बोलताना, धीरज घाटे म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेमध्ये हिंदूंचा अपमान करणारं विधान केलं आहे. हिंदू हिंसक असल्याचे ते सांगतात. फक्त दुसऱ्या धर्मांची मतं मिळविण्यासाठी मुस्लिमांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी जर हिंदू बाबत राहुल गांधी असं बोलणार असतील तर त्यांना भाजप योग्य प्रकारे उत्तर देईल.

Arvind Shinde - Dheeraj Ghate
Arvind Shinde : "तू कधी मरशील हे सांगता येत नाही, कारण...", अरविंद शिंदेंचं धीरज घाटेंबाबत धक्कादायक विधान

हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे. हिंदू हे सहिष्णू आहेत. हिंदू (Hindu) धर्माला हजारो वर्षांची परंपरा आहे. अशा हिंदू धर्माबाबत राहुल गांधी अपमानकारक विधान करत आहेत म्हणून आम्ही स्वामी विवेकानंद यांनी काढलेले उद्गार पोस्टरच्या माध्यमातून लावले आहेत. विवेकानंद म्हणाले होते, की खबरदार धर्माला नाव ठेवाल तर समुद्रात फेकून देईल. सध्या हीच भावना तमाम हिंदूंची आहे त्यामुळे ती पोस्टरच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी व्यक्त केली आहे.

Arvind Shinde - Dheeraj Ghate
Rahul Gandhi Vs Narendra Modi : एक अकेला राहुल गांधी मोदी-शहांवर भारी, ठाकरे गटानं डिवचलं

शिंदे यांनी केलेला वक्तव्याबद्दल बोलताना घाटे म्हणाले, अरविंद शिंदे हे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत. मात्र ज्या पद्धतीने केंद्रात पप्पू बालिश चाळे करतात. तोच बालिशपणा आज अरविंद शिंदे यांनी पुण्यात केला आहे. त्यांनी जे विधान केलं आहे. ते पुण्याच्या राजकीय संस्कृतीला आणि परंपरेला शोभणारं नाही. अरविंद शिंदे यांचे हे अत्यंत बालिश विधान आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com