Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis letter : महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचे जनतेला खास पत्र, म्हणाले...

Maharashtra Vidhan sabha Eletion Result : विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवलं आहे. तर विरोधकांच्या महाविकास आघाडीला मानहानीकारक पराभवास सामोरं जावं लागलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Devendra Fadnavis letter to Voters : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वातील महायुतीने दणदणीत यश मिळवलं आहे. तर विरोधकांच्या महाविकास आघाडीला मानहानीकारक पराभवास सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार आहे.'

तर यंदा मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, त्यांचे अभिनंदन केले आहे. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीही मतदरांचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे एका पत्राद्वारे आभार व्यक्त केले आहेत.

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) पत्रात म्हणतात, 'प्रिय बंधु-भगिनींनो, सप्रेम नमस्कार, महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो.'

'मेहनत, एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, मित्रमंडळी आणि माझा प्रत्येक समर्पित कार्यकर्ता ज्यांनी गेले काही दिवस जिवाचे रान करून वेळ-काळ न पाहता मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, अशा सर्वांचा मी कायम ऋणी राहीन!'

'आपणा सर्वांच्या पाठिंब्यामुळेच महायुतीला मिळालेल्या या विजयाने एक नवीन दिशा दिली आहे. हे यश आपल्या महाराष्ट्राला एक प्रगतीशील आणि सर्वसमावेशक भवितव्यासोबत मा. मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारतासह विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील. पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार. आपला विश्वास आणि प्रेम सदैव राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपलाच, देवेंद्र फडणवीस.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT