Eknath Shinde : शिवसेनेतील बंडात एकनाथ शिंदेंना साथ देणारे 'हे' पाच आमदार पराभूत

Maharashtra Assembly Election Results : शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रहार पक्षाचे प्रमुख, आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र, त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : माझ्या सोबत आलेल्या एकाही आमदाराचा पराभव झाला तर मी राजकारणातून निवृत्ती घेईल, असे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर जाहीर केले होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महायुतीला तब्बल 236 जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 58 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, शिवसेनेच्या फूटीवेळी एकनाथ शिंदेंना साथ देणाऱ्या पाच विद्यमान आमदारांचा पराभव झाला.

सांगोला मतदारसंघातून शहाजी पाटील, माहीममधून सदा सरवणकर, मेहकर मतदारसंघातून संजय रायमुलकर, उमरगा मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले, भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव यांचा पराभव झाला.

CM Eknath Shinde
Uddhav Thackeray News : ठाकरेंच्या मक्तेदारीला सुरूंग, मुंबईत भाजप महायुतीचा झेंडा

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिंदेसोबत गुवाहाटीला गेलेले शहाजी पाटील हे आपल्या 'काय झाडी काय डोंगार' या वक्तव्यामुळे प्रकाशझोतात आले होते. त्यांना सांगोला मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. शेकापचे बाबासाहेब देशमुख देशमुखांनी तेथे त्यांचा पराभव केला.

बच्चू कडू, गीता जैनही पराभूत

शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रहार पक्षाचे प्रमुख, आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र, त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. तर, अपक्ष आमदार गीता जैन यादेखील एकनाथ शिंदेंसोबत होत्या. मात्र, त्यांचा देखील पराभव झाला.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री?

भाजपने स्वबळावर 132 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री पुन्हा होणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

CM Eknath Shinde
NCP SharadChandra Pawar party : आंबेगावात 'सेम टू सेम'ने साधला नेम? पुण्यात मात्र 'सेम टू सेम'ने झाला गेम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com