Devendra Fadnavis to Uddhav Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis to Uddhav Thackeray : 'वक्फ' सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले...

Devendra Fadnavis on Waqf Reform Bill : जाणून घ्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अन् काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींचा उल्लेख करत फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Mayur Ratnaparkhe

Waqf Bill controversy : वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी (२ एप्रिल) लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी १२ वाजता सादर केले जाणार आहे. विशेष म्हणजे यावर चर्चेसाठी सभापती ओम बिर्ला यांनी आठ तासांचा वेळही राखून ठेवला आहे. यानंतर हे विधेयक संसदेत मांडले जाईल.

दरम्यान या वक्फ दुरुस्ती विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाजपने आपल्या सर्व खासदारांनी व्हीप जारी केलेला आहे. तर काँग्रेसनेही खासदारांन व्हीप बजावलेला आहे. दरम्यान हे विधेयक उद्या लोकसभेत मांडले जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना टोला लगावल्याचे दिसून आले आहे.

''वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत ! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?'' असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलरवर केलेल्या पोस्टद्वारे म्हटलेलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच वक्फ (सुधारणा) विधेयकाला मंजुरी दिली, ज्यामध्ये जेपीसीने सुचवलेल्या बदलांचा समावेश आहे. आता ते संसदेत चर्चेसाठी आणि मंजूरीसाठी सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत(Loksabha) हे विधेयक सादर केल्यानंतर ते जेपीसीकडे पाठवण्यात आले. संसदीय समितीने बहुमताने अहवाल स्वीकारला. समितीतील सर्व ११ विरोधी खासदारांनी असहमतीच्या नोंदी सादर केल्या होत्या. हा अहवाल या महिन्याच्या सुरुवातीला सादर करण्यात आला.

विरोधकांनी विधेयकावर १२ तास चर्चा करावी असे म्हटले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू(Kiren Rijiju) म्हणाले की, विधेयकावरील चर्चेचा वेळ वाढवता येतो. विरोधकांनी समितीच्या बैठकीतून सभात्याग केला होता. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी सरकारवर त्यांचा अजेंडा लादल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, विरोधकांचे म्हणणे ऐकले गेले नाही.

वक्फ विधेयकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(CM Yogi Adityanath) म्हणाले की, प्रत्येक चांगल्या कामाला विरोध असतो. वक्फ दुरुस्ती विधेयकावरूनही गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर विरोधक गोंधळ घालत आहेत. मला विचारायचे आहे की वक्फ बोर्डाने कधी मुस्लिमांसाठी काही कल्याणकारी काम केले आहे का? वक्फ हे सरकारी मालमत्तेवर कब्जा करण्याचे एक साधन बनले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT