Prashant Kortkar : प्रशांत कोरटकरचा मुक्काम कोठडीतच; जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयाने फेटाळला

Kolhapur court reject Prashant Kortkar bail : कोरटकर कळंबा कारागृहात असून अंडासेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
Prashant Kortkar
Prashant Kortkarsarkarnama
Published on
Updated on

Prashant Kortkar latest update : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक विधान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणाताली आरोपी प्रशांत कोरटकरला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याला कोल्हापूर न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

कोरटकर कळंबा कारागृहात असून अंडासेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान मंगळवारी त्याने केलेल्या जामिनाच्या अर्जावर सुनावणी झाली असून त्याचा कोठडीतला मुक्काम वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Prashant Kortkar
Udayanraje Bhosale : ''...तर मी गप्प बसणार नाही, तशी माझी ख्याती नाही'' ; उदयनराजे भडकले!

राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य करत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी प्रशांत कोरटकरने दिली होती. यानंतर त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली होती. यानंतर त्याची न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगणी केली होती.

सध्या कोरटकर 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कळंबा येथील अंडासेलमध्ये त्यास ठेवण्यात आले आहे. आज मंगळवारी (ता. 1) त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. यामुळे कोल्हापूरसह राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले होते.

Prashant Kortkar
Prashant Kishor on Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणात आता प्रशांत किशोर यांनी घेतली उडी, म्हणाले...

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रशांत कोरटकरने केले होते. तसेच कोरटकरने इंद्रजित सावंत यांना देखील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली होती. ज्याप्रकरणी कोल्हापूर येथील जूना राजवाडा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. पण तब्बल 1 महिना कोरटकर पोलिसांना गुंगारा देत होता. शेवटी त्याला तेलंगणा येथून जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com