मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvais) यांनी ८ मार्च रोजी विधानसभेत विरोधकांना संपवण्याचा सरकारचा कट असल्याचा आरोप केला. तसेच याबाबतचे त्यांनी पुरावे देखील सभागृहात सादर केले. यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेवून आणखी एक मोठी माहिती राज्याला दिली. आपल्याला पोलिसांनी चौकशीला बोलावले असून आपण उद्या सकाळी पोलिस स्थानकात हजेरी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईच्या बॉम्बस्फोट १२ मार्च रोजी झाला होता. या बॉम्बस्फोटात मृत झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करुन देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. ते म्हणाले मार्च २०२१ मध्ये भाजपच्या कार्यालयात एक पत्रकार परिषद घेवून मी महाविकास आघाडीचा (Mavahikas Aaghadi) बदल्यांचा घोटाळा बाहेर काढला होता. त्याची माहिती मी भारताचे गृहसचिवांना ही माहिती सादर केली. याचं गांभीर्य ओळखून न्यायालयाने ही चौकशी सीबीआयला दिली. सीबीआय अजूनही चौकशी करत आहे. यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही चौकशी सुरु आहे.
या दरम्यान महाविकास आघाडीने आपला घोटाळा लपवण्यासाठी एक गुन्हा दाखल केला आहे. यानुसार ऑफिशीयल सिक्रेट्स अॅक्टमधील माहिती लिक कशी झाली? असा गुन्हा दाखल आहे. याबद्दल पोलिसांनी चौकशीसाठी मला एक प्रश्नावली पाठवली. मी त्यांना उत्तर दिले की याची माहिती मी त्यांना देईन, असे ते म्हणाले.
मात्र विरोधी पक्ष नेते म्हणून हा माझा विशेषाधिकार आहे की, माझी माहिती कुठून आली हा प्रश्न विचारला जावू शकत नाही. मात्र मला पुन्हा प्रश्नावली पाठवण्यात आली. तसेच न्यायायलात सांगण्यात आलं की मला प्रश्नावली पाठवून देखील मी उत्तर देत नाही. यानंतर काल मुंबई पोलिसांनी सीआरपीसी १६० ची नोटिस पाठवण्यात आली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना दिली.
यानुसार या गुन्ह्याच्या चौकशीसाठी मला उद्या ११ वाजता बीकेसीमधील सायबर पोलिस स्थानकात बोलवण्यात आलं आहे. आता जरी मला विशेषाधिकार असला आणि माझ्या माहितीचा स्रोत विचारला जावू शकतं नाही. याउलट मी कोणतीही माहिती बाहेर येवू दिलेली नाही. मी ही सगळी माहिती मी थेट केंद्रीय गृहसचिवांना दिली आहे. जी माहिती बाहेर आली ती राज्य सरकारच्या मंत्र्यांनीच पत्रकार परिषदेत दिली.
पण या सगळ्यानंतरही मी त्याठिकाणी जाणार आहे आणि पोलिसांना चौकशीला सहकार्य करणार आहे. त्यांना हवी असलेली सगळी उत्तर देणार आहे. याचे कारण मी राज्याचा गृहमंत्री राहिलो आहे. पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
परंतु माझं मत आहे की, माहिती कुठून आली याचा विचार करण्यापेक्षा ६ महिन्यांपेक्षा जास्त दिवस या घोटाळ्याचा अहवाल पडून असताना कारवाई का केली नाही? कोणी किती पैसे दिले? कोण पैसे देवून कोणत्या पदावर गेले याची सगळी माहिती त्या अहवालात होती. त्यामुळे पोलिसांनी याबद्दल सरकारवर कारवाई करणे आवश्यक आहे, असेही फडणविस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.