भिंतीवरील घड्याळाने घात केला अन् फडणवीस यांनी टायमिंग साधले...

Devendra Fadnavis | Pravin Chavan | : प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयात विरोधकांना संपवण्याचा कट शिजल्याचा देवेंद्र फडणविसांचा आरोप
Devendra Fadnavis - Pravin Chavan
Devendra Fadnavis - Pravin Chavan Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ८ मार्च रोजी विधानसभेत सरकारी वकिल प्रविण चव्हाण (Pravin Pandit Chavan) यांच्या कार्यालयात विरोधकांना संपवण्याचा सरकारचा कट रचला जात असल्याचा आरोप केला. तसेच याबाबतचे त्यांनी पुरावे देखील सभागृहात सादर केले. यावरून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

या बॉम्बनंतर चव्हाण गायब झाले होते. मात्र प्रविण चव्हाण आता माध्यमांसमोर आले असून त्यांनी या प्रकरणाचे जळगाव कनेक्शन स्पष्ट केले. तसेच हे संपूर्ण प्रकरण कसे घडले असावे याचा देखील त्यांनी उलगडा केला. ते म्हणाले, जळगावमधील तेजस मोरे हा आपला अशिल असून त्याने एक घड्याळ भेट दिले होते. याच भिंतीवरील घड्याळात कॅमेरा बसवून हे स्टिंग ऑपरेशन केले असण्याची शक्यता आहे.

चव्हाण पुढे म्हणाले, हे सर्व रेकॉर्डिंग मॅन्यूपुलेट करण्यात आले आहे. यातील आवाज आपला नाही. आपल्याकडे एक अशिल तेजस मोरे येत होता. एका प्रकरणात त्याला आपण जामीन मिळवून दिला होता. त्याचे पैसेही त्याच्याकडे बाकी आहेत. तो जळगाव येथील रहिवासी आहे. तो नेहमी आपल्याकडे येत असे. आपल्याला वस्तू भेट देण्याचे सांगत असे. परंतु त्याला आपण नकार दिला.

Devendra Fadnavis - Pravin Chavan
देवेंद्र फडणविसांना पोलिसांनी बोलावले! उद्या सकाळी लावणार हजेरी...

या दरम्यान त्याने एक दिवस भिंतीवरचे घड्याळ भेट दिले. ते त्याने आपल्या कार्यालयात समोरच्या भिंतीवर बसविले. त्यात कॅमेरा बसवून चित्रीकरण केले असावे. तो जळगाव येथील असल्याने त्याला मॅनेज केले असावे असे आपणास वाटते. याबाबत आपण संपूर्ण कायद्याचा अभ्यास करून स्वतः गुन्हा दाखल करणार आहोत. मात्र यातील कोणतेही संभाषण खरे नाही. सर्व मॅन्यूपुलेट केले आहे असा दावा त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com