Dhananjay Munde Sarkarnama
महाराष्ट्र

Dhananjay Munde : अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत धनंजय मुंडेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'व्हायचे ते...'

Ajit Pawar oath ceremony News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचा पहाटेचा शपथविधी हा षडयंत्राचा भाग असल्याचा खळबळजनक दावा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला.

Pradeep Pendhare

Shirdi News : 'अजित पवार यांनी घेतलेली पहाटेची शपथ हा एक षडयंत्राचा भाग होता. मी विनंती करत होतो, साहेब काहीतरी गडबड आहे. तुमच्या पाया पडतो. शपथविधीला जाऊ नका. परंतु जे व्हायचे ते झालेच आणि अजितदादा यांना पुढे व्हिलन ठरवले गेले', असा खळबळजनक दावा मंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवसंकल्प शिबिरात केला. परंतु अजितदादांविरुद्ध हे षडयंत्र कोणी रचले यावर त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.

मंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात सहभागी झाले होते. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येवरून, गुन्हेगारीवरून आणि पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीत मंत्री मुंडे यांना डावलले गेले आहे. मंत्री मुंडे विरोधकांकडून चौफेर घेरले गेले असतानाच, त्यांनी शिर्डी येथील शिबिरात सकाळच्या शपथविधीवर खळबळजनक दावा केला. मंत्री मुंडे यांच्या दाव्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अजितदादांचा देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचा तो पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होते, असे मी वारंवार अजितदादांना सांगत होतो. परंतु अजितदादा यांनी काहीही होत नाही, असे सांगून शपथविधीला गेले. पुढे अजितदादा हे व्हिलन ठरले. हे षडयंत्र कोणी रचले? कशासाठी रचले? हे काही सांगण्याची ही वेळ नाही, असे सांगून त्यावर अधिक मौन बाळगले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यापासून अजितदादांच्याबरोबर मी ठामपणे उभा आहे. अनेक आंदोलन केले पक्ष संघटना वाढीसाठी वेगवेगळे निर्णय घेतले. अजितदादांनी पक्षात दिलेल्या संधीचे सोनं करत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले. परंतु बीडमधल्या एका दुर्दैवी घटनेमुळे मला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. अशा या काळात माझ्याविषयी चुकीची माहिती अजितदादांना काही जण देत आहेत. परंतु अजितदादा पक्षासह माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास मंत्रिमंडळ यांनी व्यक्त केला.

अर्जुनाप्रमाणे चक्रव्यूह भेदण्याची ताकद माझ्यामध्ये : धनंजय मुंडे

माझ्यावर चुकीचे आरोप करून मला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला. मला अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला, तरी ते शक्य होणार नाही. कारण मी अर्जुन आहे. चक्रव्यूह भेदण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. अजितदादांनी बीडचे पालकमंत्रीपद घेतल्याचा आनंद आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ही दुर्दैवी आहे. त्यातील आरोपींना फासावर लटकावे, असे माझे वैयक्तिक मत आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, असे माझे स्वच्छ मत आहे, असेही मंत्री मुंडे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT