Ajit Pawar Pune Guardian minister : ...अखेर पुण्याचे 'दादा' अजित पवारच ठरले; पालकमंत्रिपद भाजप ऐवजी राष्ट्रवादीकडेच!

NCP got Guardian ministership of Pune : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पुण्यासह बीड जिल्ह्याचेही पालकमंत्री पद दिले गेले आहे.
Ajit Pawar Pune Guardian minister and Chandrakant Patil
Ajit Pawar Pune Guardian minister and Chandrakant Patilsarkarnama
Published on
Updated on

Guardian Minister Pune News : राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने मुख्यमंत्री कोण होणार याबाबतच्या मोठा चर्चा रंगल्या होत्या. त्याच पद्धतीने आता पुण्याचा पालकमंत्री पद हे भाजपकडे राहणार की? ते पुन्हा राष्ट्रवादीला मिळणार या याबाबत दावे प्रतिदावे करण्यात येत होते. मात्र अखेर पुण्याचे पालकमंत्री पुन्हा एकदा अजित पवारच राहणार यावर शिक्कामोर्तब झाला असून अजित पवारांकडे पुण्यासह बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात अली आहे.

अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेला पालकमंत्री पदाचा तिढा आता सुटला असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाचे वाटप केला आहे. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit pawar) तर दुसरीकडे भाजपाकडून कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री पदासाठी दावेदार होते. मात्र चंद्रकांत पाटील यांना सांगलीचे पालकमंत्री पद देत पुण्याचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवला आहे.

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात भाजपाचे(BJP) आमदारांची संख्या जास्त असल्याने पालकमंत्री पद भाजपाला मिळणार असा विश्वास भाजपचे स्थानिक नेते व्यक्त करत होते. तर दुसरीकडे अजित पवारांशिवाय पुण्याचं पालकमंत्री पद कोणाकडे जाऊ शकत नाही, असं ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते व्यक्त करत होते.

Ajit Pawar Pune Guardian minister and Chandrakant Patil
Guardian Minister : महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी! अजित पवार बीड अन् पुण्याचे पालकमंंत्री; अशी आहे पालकमंत्र्यांची यादी

त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पुण्याचा पालकमंत्री पद राखण्यात राष्ट्रवादीला आणि अनुषंगाने अजित पवारांना यश आला आहे.

Ajit Pawar Pune Guardian minister and Chandrakant Patil
Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्याप्रकरण धनंजय मुंडेंना भोवलं; पालकमंत्रिपदासाठी पत्ता कट

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांचा राजीनामा घेण्याची मागणी सातत्याने जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचे पालकमंत्री पद येणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारावे अशी देखील मागणी होत होती. मात्र अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्री पद देखील स्वतःकडेच ठेवणे पसंत केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com