Ajit Pawar : पालकमंत्रिपदाचा चेहरा दादा अन् कारभारी धनंजय मुंडे ? शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली चिंता व्यक्त

Sharad Pawar NCP politics News : पुण्यासह बीडचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवले. बीडचे पालकमंत्रिपद अजित पवारांनी स्वतःकडे ठेवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काही शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत.
Ajit Pawar and Dhananjay Munde
Ajit Pawar and Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेले पालकमंत्रिपदाचा वाटप शनिवारी जाहीर करण्यात आले. पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर बीडचे पालकमंत्री पद कोणाकडे जाणार याबाबतची उत्सुकता संपली आहे. पुण्यासह बीडचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवले. बीडचे पालकमंत्रिपद अजित पवारांनी स्वतःकडे ठेवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काही शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत.

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये वाल्मीक कराड हा मास्टर माईंड असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तो मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्यावर देखील आरोप होत आहेत. त्यामुळे सातत्याने विरोधी पक्षाकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Ajit Pawar and Dhananjay Munde
Ajit Pawar : अजितदादांनी मुंडेंच्या भेटीनंतर एका रात्रीतच का केली बीड राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त ? खरं कारण समोर

या पार्श्वभूमीवर बीडचे पालकमंत्रिपद धनंजय मुंडे यांच्याकडे राहणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अजित पवारांनी (Ajit Pawar) बीडचे पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवले आहे, असे असले तरी या गोष्टीवर देखील विरोधी पक्षाकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे.

Ajit Pawar and Dhananjay Munde
Devendra Fadnavis : दावोसला जाण्यापूर्वी फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय; 'या' तीन विश्वासू नेत्यांकडे सोपवली दुहेरी जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले बीडचे पालकमंत्रिपद हे अजित पवार यांना मिळाले आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, ज्या पद्धतीने अजित पवार पुण्यावर लक्ष देतात, त्याच पद्धतीने त्यांनी बीडवर देखील लक्ष देणे आवश्यक आहे, असे होऊ नये की चेहरा हे अजित पवार आहेत आणि कारभार मात्र दुसराच कोणीतरी बघतोय, असे म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

Ajit Pawar and Dhananjay Munde
Dhananjay Munde : बीडचं पालकमंत्रिपद गमावल्यानंतर धनंजय मुंडेंचं पहिलं ट्विट; म्हणाले, '…याचा मला आनंद वाटतो!'

रोहित पवार पुढे म्हणाले, 'अजित पवार यांची कामाची धडाडी, प्रशासनावर असलेली वचक याचा वापर करून ज्या पद्धतीने ते पुण्यात काम करतात. त्याच पद्धतीने त्यांनी बीडमध्ये देखील काम करणे आवश्यक आहे. बीडचे पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी बीडला महिन्यात एकदा न जाता किमान आठवड्यात एकदा तरी बीड येथे जाऊन पोलीस प्रशासनावर देखील नियंत्रण आणणे आवश्यक आहे.'

Ajit Pawar and Dhananjay Munde
MLA Rohit Pawar On Beed : राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन अन् गुंड असा आहे 'बीड पॅटर्न'

बीडमध्ये सामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी पोलीस प्रशासनावर लक्ष देणे आवश्यक आहे. अजित पवार हे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे. बीडमधील सर्व गोष्टींवर अजित पवार स्वतः लक्ष देऊन स्वतः बीडचे पालकमंत्री आहेत, असे काम करणे आवश्यक असल्याचा टोला रोहित पवारांनी लगावला.

Ajit Pawar and Dhananjay Munde
Sanjay Shirsat As Guardian Minister : पालकमंत्री पद संजय शिरसाट यांच्यासाठी ठरणार काटेरी मुकुट!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com