Sushma Andhare Dhananjay Munde  sarkarnama
महाराष्ट्र

Sushma Andhare : धनंजय मुंडेंच्या बेल्स पाल्सी आजाराचा अर्थ सुषमा अंधारेंनी मराठीतून सांगितला; म्हणाल्या, राजकारण जीवघेणं...

Sushma Andhare Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी आजाराचे निदान झाले आहे. या आजारामुळे सलग दोन मिनिटेसुद्धा बोलणे शक्य होत नाही.या आजाराचा अर्थ मराठीतून सुषमा अंधारे यांनी सांगितला आहे.

Roshan More

Sushma Andhare News : मागील काही दिवसांपासून सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's Palcy) या आजाराचे निदान झाले आहे. त्यांनी सोशल मीडियातून ही माहिती दिली आहे. या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटे व्यवस्थित बोलता येत नाही. त्यांच्या या आजाराविषयी माहिती समोर येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुंडे यांना झालेला आजाराचा अर्थ मराठीतून सांगितला आहे.

सुषमा अंधारे यांनी फेसबूकवर मुंडेंच्या यांच्या आजारा विषयी पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या आहेत की, धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमावरून Bell's Palcy या विकाराने ग्रस्त असल्याचे कळले आहे. हा विकार म्हणजे मराठीतून सोप्या भाषेत अर्ध्या चेहऱ्यावरून वारे जाणे.

अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, Bell's Palcy याने चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये बदल जाणवतात ज्यामुळे अचानक चेहऱ्याच्या काही भागांमध्ये फडफड किंवा थरथर जाणवायला लागते. सलग दोन मिनिटे बोलणे सुद्धा रुग्णाला अशक्य होते. अत्याधिक मानसिक तणावामुळे हा विकार उद्भवू शकतो. थोडक्यात, राजकारण जीवघेणे असते.

आजाराविषयी धनंजय मुंडें काय म्हणाले?

आपल्या ट्विटरवरून धनंजय मुडें यांनी Bell's Palcy निदान झाल्याचे सांगितले. तसेच त्यांच्यावर उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही, असे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT