Manikrao Kokate Guilty : माणिकराव कोकाटेंचे शिक्षा प्रकरण सरकारच्या अंगाशी? काँग्रेसकडून मुख्यमंत्री टार्गेट; म्हणाले, 'सरकारची लाज...'

vijay wadettiwar Criticized Manikrao Kokate mahayuti Government : 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला आहे.
Vijay Wadettiwar-Manikrao Kokate
Vijay Wadettiwar-Manikrao Kokate Sarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar News : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कागदपत्रांचा फेरफार करत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षा झाली आहे. न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. मात्र, या प्रकरणी कोकटे थेट उच्च न्यायालयात गेले आहे. सरकारमधील विद्यमान मंत्र्याला शिक्षा झाल्याने विरोधकांकडून टीका करत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

माजी विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे विधीमंडळचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत माणिकराव कोकाटेंसह महायुती सरकारवर जहरी टीका केली आहे. वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आरोपीचे नाव : माणिकराव कोकाटे पद: महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री झालेली शिक्षा: 2 वर्ष कारावास, 50,000 रुपयांचा दंड. गुन्हा: कागदपत्रांची फेरफार करून आर्थिक फसवणूक .शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा!'

वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, '1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला आहे. यात मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, 50 हजार रूपयांचा दंडही कोर्टाकडून ठोठावण्यात आला आहे. इतके उद्योगी आणि तेजस्वी लोक महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत की दररोज सरकारची लाज निघत आहे.'

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा

आपल्या ट्विटमध्ये माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेच्या प्रकरणावरून वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोनही उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले आहेत की, दररोज आरोप होत आहे. कोर्टाकडून शिक्षेचे आदेश निघत आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आरोपी मंत्र्यांना स्वतः क्लिनचीट देऊन त्यांची पाठराखण करत आहे!

Vijay Wadettiwar-Manikrao Kokate
Manikrao Kokate : अजित पोवारांनी दिला कृषीमंत्री कोकाटेंना इशारा; म्हणाले, गनिमी काव्याने...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com