Dhananjay Munde Sarkarnama
महाराष्ट्र

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात? रंजित कासलेंच्या आरोपांचा धागा पकडून शरद पवार गटाचा नेता जाणार हाय कोर्टात...

Dhananjay Munde faces MLA disqualification threat as Sharad Pawar group leader to move High Court over Ranjit Kasle’s allegations : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्या आमदारकी विरोधात हाय कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

Ganesh Sonawane

निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातील EVM च्या स्ट्रॉंगरुमपासून दूर जाण्यासाठी आपल्याला मुंडे यांच्या माणसाने खात्यावर १० लाख रुपये टाकल्याचा आरोप केला आहे. कासले यांच्या या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी या प्रकरणी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते मुंडेंच्या आमदारकीविरोधात हाय कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. एकट्या रंजित कासले यांना जर दहा लाख रुपये दिले असतील तर इतरांना किती पैसे दिले असतील? असा सवाल राजेसाहेब देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

गुरुवारी पुण्यात पत्रकारपरिषद घेऊन रंजित कासले यांनी खळबळ उडवून दिली. धनंजय मुंडेंच्या माणसाने ईव्हीएमपासून दूर जाण्यासाठी आपल्याला दहा लाख रुपये दिल्याचा आरोप त्यांनी केला. दिले हे सांगताना कासले यांनी यावेळी त्यांचं बँक स्टेटमेंट देखील दाखवलं. त्यातील साडेसात लाख रुपये आपण वापस केले, तर उरलेल्या अडीच लाख रुपयांमधून माझा खर्च सुरू आहे, असं कासले यांनी म्हटलं होतं. आता तोच धागा पकडत व दाखला देत राजेसाहेब देशमुख यांनी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

धनंजय मुंडे कोण आहेत? आणि त्यांचे काय कार्य आहे? आणि लोकशाहीत किती सक्षमपणे काम चाललं आहे, हे तुम्ही सर्वांनी आता पाहिलं, म्हणून मी आता या प्रकरणात दाद मागण्यासाठी हाय कोर्टात जाणार आहे, असे राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले आहे. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना राजेसाहेब देशमुख यांनी आव्हान दिलं होतं. पण त्यात देशमुख यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता.

दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील आपण घालवू असा इशारा दिला होता. त्यांनी यासंबधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचीही भेट घेतली होती. राज्य शासनाच्या महाजेनकोकडून धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्या कंपनीला एक कंत्राट देण्यात आले होते. या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी आपल्या कंपनीचा थेट फायदा करून घेतला. हे लोकप्रतिनिधींसाठी घालून देण्यात आलेल्या ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नियमाचे थेट उल्लंघन असल्याने धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद सोडा, त्यांची आमदारकीही रद्द होऊ शकते, असे दमानिया यांनी म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT