
Pune News : महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेससारखा मोठा पक्ष फुटल्यानंतर राज्याची राजकीय समीकरणंही बदलली. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये टोकाच संघर्ष होताना दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत 41 आमदार निवडून आणत आपलं महायुतीतील वजनही वाढवलं. एकीकडे गेल्या 10 दिवसांत शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) हे वेगवेगळ्या निमित्तानं तीनदा एकत्र आलेलेही दिसून आले होते. यातच आता अजित पवारांनी पुन्हा एकदा जाहीररित्या मोठी कबुली दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शुक्रवारी (ता.18) मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले,मागच्या काळात आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील काम करत होतो. त्यांचे छत्र आमच्यावर होते. पण आता आम्हाला कोणीचं छत्र राहिलेलं नाही. त्यामुळे आम्ही आढावा घेत असल्याचंही अजितदादांनी यावेळी सांगितलं.
तसेच अडचणी काय आहेत पाहतो. कोणी काय केलं पाहिजे हे ठरवतो. आम्ही अनेक वर्ष आदरणीय शरद पवारसाहेबाच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. त्यामुळे आम्हाला अनुभव आहे की, कधी काय भूमिका घ्यायची. कोणत्या विषयावर काय भूमिका घ्यायची, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही हा आमचा निर्धार आहे. या योजनेसासाठी 40 ते 45 हजार कोटी रुपये खर्च आहे. त्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर काटकसर देखील आम्ही करत आहोत. वाढवणला आम्ही नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ करु पाहत आहोत. म्हणजे मुंबईला एकूण तीन विमानतळ होतील,असंही ते म्हणाले.
एआयचा वापर केल्याशिवाय पुढील काळात पर्याय राहणार नाही.आधी साक्षर - निरक्षर होते. नंतर संगणक साक्षर आले. आता एआय आले आहे.एआयसाठी 500 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात ठेवली आहे. मी उपमुख्यमंत्री असलो तरी,बारामतीला गेल्यावर शेतात एक चक्कर टाकतोच. तसा आपला शेतकरी हुशार आहे. त्याला कळले की, एआयमध्ये फायदा तर तो नक्कीच त्याचा स्विकार करेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यापैकी कोणीशी चांगले ट्युनिंग आहे - सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, कोणाशी जुळतंय. तुम्ही परत खुंटा हलवून बळकट करु नका, माझा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा असल्याचंही अजितदादांनी यावेळी बोलून दाखवलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.