Ramdas Athawale, Dhananjay Munde, Ajit Pawar And Walmik Karad sarkarnama
महाराष्ट्र

Ramdas Athawale : धनंजय मुंडे प्रकरणात आठवलेंची उडी, मागितला राजीनामा

Ramdas Athawale On Dhananjay Munde resignation : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बीड जिल्ह्यातील वादग्रस्त प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना आपली स्पष्ट भूमिका केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : मस्साजोग (बीड) गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण सध्या गाजत आहे. यामध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी आहे. वाल्मिक कराड हाच या सर्व प्रकरणाचे आणि बीड मधील विविध घटनांच्या मागील आका असल्याचा दावा देखील विविध नेत्यांनी यापूर्वीच केला आहे. दरम्याना विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामासाठी सरकारवर दबाव आहे. आता त्याला महायुतीच्या घटक पक्षांतूनही साथ मिळू लागल्याचे चित्र आहे.

आता या प्रकरणात केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. याद्वारे धनंजय मुंडे आणि बीड जिल्ह्यातील वादग्रस्त प्रकरणात हात घालत मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, अशी ठाम भूमिका आठवले यांनी घेतली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

या संदर्भात रामदास आठवले म्हणाले, धनंजय मुंडे यांचा देशमुख हत्या प्रकरणाशी थेट संबंध नाही. मात्र वाल्मिक कराड हा त्यातील मुख्य संशयित आहे. वाल्मिक कराड यांचे धनंजय मुंडे यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे काही प्रमाणात हा दोष मुंडे यांच्याकडे जातोच. हे नाकारता येणार नाही.

दोषी सिद्ध होणार की नाही ही बाब वेगळी आहे. मात्र सध्या महाराष्ट्रातील एकंदर वातावरण आणि कल पाहता नैतिकतेच्या आधारावर मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे.

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. या संदर्भात आमदार सुरेश धस यांनी पोलिसांना माफ करा, असे विधान केले होते. त्याचाही आठवले यांनी चांगलाच समाचार घेतला. सुरेश धस संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन्ही प्रकरणात वेगवेगळी भूमिका कशी घेऊ शकतात? याबद्दल आश्चर्य वाटते, असे आठवले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT