
Solapur, 24 February : जगभरात गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. इस्त्राइल-हमास युद्ध सुरू आहे. जगभरातील ही युद्धं थांबली पाहिजेत, अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. डोनाल्ड ट्रम्प हे आता अमेरिकेचे अध्यक्ष झाले आहेत आणि ते रिब्लिकन पक्षाचे आहेत. त्यांनी रशिया-युक्रेन आणि इस्त्राइल-हमास ही दोन युद्धे थांबवावीत, कारण ही दोन्ही युद्धं वाढविण्यात अमेरिकेचाही मोठा सहभाग आहे, त्यामुळे ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी बोलावं, असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. खेड येथील कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रमापूर्वी आठवले यांनी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. त्या परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री आठवले यांनी युद्ध थांबवण्याची भूमिका मांडली.
आठवले म्हणाले, रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून युद्ध सुरू आहे. तसेच, इस्त्राइल-हमास युद्ध सुरू आहे. जगभरातील ही युद्धं थांबली पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. आता अमेरिकेचे अध्यक्ष हे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) झाले आहेत. ते रिब्लिकन पक्षाचे आहेत. त्यांनी रशिया-युक्रेन आणि इस्त्राइल-हमास ही दोन युद्धे थांबवावीत, कारण ही दोन्ही युद्धं वाढविण्यात अमेरिकेचाही मोठा सहभाग आहे, त्यामुळे ट्रम्प यांनी पुतीन यांच्याशी बोलावं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांतता हवी आहे, या भूमिकेचे आहेत. त्यामुळे मोदी यांनी भुवनेश्वर येथे प्रवासी भारतीयांसमोर बोलताना ‘आम्हाला युद्ध नकोय, आम्हाला बुद्ध हवाय’ अशी भूमिका मांडली आहे. विश्वशांतीचा विचार देणाऱ्या बुद्धांकडे सर्व जगाचे लक्ष आहे. त्यामुळे अशी युद्धे होऊ नयेत, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
युद्धही झाले तरी भारत पाकिस्तानला हरवू शकतो
ते म्हणाले, भारताने पाकिस्तानला अनेक वेळा क्रिकेटच्या सामन्यात हरवले आहे. युद्धही झाले तरी आपण पाकिस्तानला हरवू शकतो. पण युद्धाची आवश्यकता नाही. पाकिस्तानेच आता पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात द्यावा आणि त्याने भारताशी चांगले संबंध ठेवावेत. त्याचा पाकिस्तानाला आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो.
सामाजिक न्याय विभागाला केंद्रीय पातळीवर एक लाख ६८ हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. त्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात, असेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.