Dhananjay Munde .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Dhananjay Munde resignation : मोठी बातमी : राजीनामा का दिला? धनंजय मुंडेंनी सांगितली दोन कारणं...

Maharashtra Cabinet Minister Santosh Deshmukh Murder Case : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला आहे.

Rajanand More

Mumbai News : राज्याच्या राजकारणात मंगळवारी मोठी घडामोड घडली. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा स्वीकारला आहे. या राजीनाम्यानंतर मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी राजीनाम्यामागे दोन कारणे सांगितली आहेत.

मुंडे यांनी एक्सवर पोस्ट करत राजीनाम्याचे कारण सांगितले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणासह प्रकृतीचे कारण त्यांनी दिले आहे. मुंडे यांनी म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे.

काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.

दरम्यान, मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस यांनी मीडियासमोर यावर शिक्कामोर्तब केले. त्यांनी केवळ चार वाक्यातच हा विषय संपवला. ते म्हणाले, आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना मुक्त करण्यात आले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपत्रामध्ये हत्येचे अनेक फोटो व व्हिडीओ जोडले आहेत. हे फोटो सोमवारी सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर पुन्हा एकदा मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. अखेर आज त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT