Rohit Pawar : 'थोरल्या मुंडेंनी चाबकाने फोडलं असतं', रोहित पवारांची धनंजय मुंडेंवर जळजळीत टीका

Rohit Pawar On Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय. यावरून विरोधकांनी विविध प्रतिक्रिया देताना महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
Rohit Pawar, Ajit Pawar And Dhananjay Munde
Rohit Pawar, Ajit Pawar And Dhananjay Mundesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली होती. याचे काही फोटो आणि व्हिडिओ आता व्हायरल होत असून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणावरून विरोधकांनी महायुती सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीदेखील, सरकारच्या धोरणावरून जोरदार टीका केली आहे. त्यांनी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना, तुमच्याकडे मन आहे का? असा सवाल केला आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्येचे फोटो व्हायरल होताच राज्याचं मन हेलावले आहे. यानंतर बीडमध्ये आक्रोश केला जात असून जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. तर सरकारवर आता जनतेतून टीका होताना दिसत आहे. तर राज्याच्या अधिवेशात देखील याचे पडसाद उमटले असून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला टीका केली आहे. गृहखात्यासह सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना या घटनेची सर्व माहिती असताना सुद्धा आरोपींना व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जातेय असा दावा आता केला जातोय. यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा स्वीकरण्यात आला आहे.

दरम्यान यावरून रोहित पवारांनी जळजळीत प्रतिक्रिया देताना, बीडमधील गुंडांनी राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर लघुशंका केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांनी, हा रिपोर्ट, हे फोटो कालच आपल्याकडे आले होते. पण दोन महिन्यांपूर्वीच हे फोटो आणि व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांकडे सुद्धा आले असावेत. मात्र त्यांनी याबाबत धाडसी निर्णय घेतला नाही. तुमच्याकडे मन आहे का नाही? असा सवाल रोहित पवारांनी केलाय.

Rohit Pawar, Ajit Pawar And Dhananjay Munde
Rohit Pawar : "मी पक्षात कमी पडतोय, असं काही नेत्यांना वाटतंय"; रोहित पवारांच्या नाराजीचा रोख कोणाकडे?

रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती करताना, तुमची आणि मुंडेंची मैत्री असेल, संबंध असतील ते कचऱ्यात टाका. पण, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. वाल्मिक कराड हा राक्षसी माणूस असून तो मुंडेंचा अगदी खास असल्याची अख्ख्या जगाला माहिती आहे. याचे पुरावे, फोटो दोन महिन्यांपासून सरकारकडे असतानादेखील सरकारने कोणतीच कारवाई केलेली नाही. हे सरकार आरोपींची आणि धनंजय मुंडे यांची पाठराखण करत आहे का? असाही घणाघात रोहित पवार यांनी केला.

अजित पवारांना आवाहन

या प्रकरणावरून रोहित पवार यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन केले आहे. मी एक नागरिक, तुमचा पुतण्या म्हणून सांगतोय, मुंडेंचा राजीनामा घ्या. निर्णय घेण्याची धमक दादांमध्ये असून अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुंडेंचा राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे, असे आवाहान केलं आहे.

चाबकाने मारले असतं

धनंजय मुंडेंवर हल्लाबोल करताना, रोहित पवार यांनी, थोरले मुंडे आज असते, तर त्यांनी धनंजय मुंडेंना चाबकाने मारलं असतं, अशी जळजळीत टीका केली आहे. तर या प्रकरणात पंकजा मुंडे यांनीदेखी समोर यायला हवं होतं. असो पण आता मुंडे यांचा राजीनामा घेण्याचे धाडस सरकारने दाखवावे असे विरोधकांचे मत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar, Ajit Pawar And Dhananjay Munde
BJP Ram Shinde vs Rohit Pawar : राम शिंदेंनी रोहित पवारांची आमदारकी आणली अडचणीत; न्यायालयाची नोटीस...

मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला

दरम्यान यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुंडेंचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे. तर पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com