Dhanajay Munde-Namdev Shashtri News Sarkarnama
महाराष्ट्र

Namdev Shastri On Dhananjay Munde: नामदेव शास्त्रींनी पुन्हा घेतली धनंजय मुंडेंची बाजू; म्हणाले,'पहिल्या पदावर येऊन त्यांच्याकडून...'

Mahant Namdev Shastri offers prayers to Bhagwanbaba, expressing hope that Dhananjay Munde returns to his position and contributes to social welfare once again. : सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा चांगली वाणी बंद पडली, ती पुन्हा सुरू व्हावी. पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्याकडून घडावं एवढेच बोलू.

Jagdish Pansare

Beed News : भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. धनंजय मुंडे यांच्यासाठी त्यांचा शब्द अंतिम असतो. मस्साजोग प्रकरणात जेव्हा धनंजय मुंडे अडचणीत आले तेव्हा नामदेव शास्त्री यांनी त्यांची पाठराखण केली होती. परंतु धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी भगवानगडावर जाऊन जेव्हा त्यांची भेट घेतली आणि वस्तुस्थिती सांगितली तेव्हा शास्त्रींनी आपली भूमिका काहीसी बदलली.

मात्र संत श्री भगवानबाबा नारळी सप्ताहासाठी निघालेल्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या हेलिकाॅप्टरला उड्डाणाची परवनागी मिळाली नाही आणि त्यांचा हा नियोजित दौरा रद्द करावा लागला. तो रद्द करण्यापुर्वी धनंजय मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांना कल्पना देऊन त्याबद्दल क्षमाही मागितली. धनंजय मुंडे यांचा दौरा अचानक रद्द झाल्याबद्दल जेव्हा माध्यमांनी शास्त्रींना विचारले तेव्हा त्यांनी धनंजय मुंडे हे भगवान गडाचेच आहेत हे यापुर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे आपण टेन्शन घेऊ नका, आपण मोठा कार्यक्रम करू. त्यांच्या गालावरून वारे गेले आहे.

सगळ्यांनी मिळून भगवानबाबाला प्रार्थना करा चांगली वाणी बंद पडली, ती पुन्हा सुरू व्हावी. पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्याकडून घडावं एवढेच बोलू, अशा सदिच्छा नामदेव शास्त्री (Namdev Shashtri) यांनी व्यक्त केल्या. धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून ते सार्वजनिक कार्यक्रमापासून अंतर राखून आहेत. एवढेच काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकांनाही ते हजर राहिले. परळीतील आपल्या जगमित्र कार्यालयात आणि मतदारसंघातील विकास कामांना मात्र ते भेटी देतांना दिसले.

मात्र जाहीर कार्यक्रमांना जाणे ते टाळत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपळनेर येथील नारळी सप्ताहात त्यांची गैरहजेरी सर्वांना खटकली. त्याबद्दलचे स्पष्टीकरण दिल्यानंतरही धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीबद्दल माध्यमांनी वारंवार विचारले, तेव्हा आपण राजकीय न बोललेलं बरं अस, म्हणत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. परंतु त्यांचे धनंजय मुंडे यांच्यावर असलेले विशेष प्रेम व्यक्त झालेच. संकटाच्या काळात भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचे नामदेव शास्त्री यांनी याआधीच जाहीर केले होते.

त्यानंतर आज नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली. भगवान गडाचे म्हणून धनंजय मुंडे यांना जाहीर केले आहे. म्हणून तुम्ही त्याच टेन्शन घेऊ नका. यानंतर आपण मोठा कार्यक्रम करू, त्यांच्या गालावरून वारे गेले आहे. सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा चांगली वाणी बंद पडली, ती पुन्हा सुरू व्हावी. पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्याकडून घडावं एवढेच बोलू, असेही नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे. बीडचे भूमिपुत्र धनंजय मुंडे आज आपल्या कार्यक्रमाला येणार होते. मात्र त्यांना हेलिकॉप्टरचा क्लिअरन्स मिळाला नाही, म्हणून त्यांचा दौरा रद्द झाला, दोन तास हेलिकॉप्टरची परवानगी मिळाली नाही, असेही शास्त्री यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री होते, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारमध्ये कृषी मंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींसोबतच्या संबंधामुळे अडचणीत असताना त्यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री करण्यात आले. परंतु त्यांचे हे मंत्री पद औटघटकेचे ठरले. राजकीय दबाव आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड यांच्याशी असलेले जवळचे संबंध यातून मुंडे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT