Dhananjay Munde News : कार्यक्रमास आपल्यामुळे विलंब नको, धनंजय मुंडे नारळी सप्ताहात येणार नाहीत !

Dhananjay Munde will not attend the Narali Saptah of Sant Bhagwanbaba due to last-minute denial of flight permission, leading to sudden cancellation of his tour. काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने माझा आजचा पिंपळनेर (शिरूर कासार) दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे.
EX Minister Dhananjay Munde News
EX Minister Dhananjay Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : माजी मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील शिरुर कासाऱ येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहाला यंदा येणार नाहीत. या संदर्भात त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत न येण्याचे कारणही स्पष्ट केले आहे. नारळी सप्ताहाला बीड जिल्ह्यात मोठे महत्व आहे. धनंजय मुंडे या सप्ताहाला आवर्जून हजेरी लावत असतात. मात्र यावेळी ते येणार नाहीत, त्यांच्या न येण्यामागे तांत्रिक कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी या संदर्भात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी पिंपळनेर (ता. शिरूर कासार) येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात येण्यासाठी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून मुंबई येथील पवन हंस विमानतळावर आहे. मात्र काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने माझा आजचा पिंपळनेर (शिरूर कासार) दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे.

अध्यात्मिक कार्यक्रमास आपल्यामुळे विलंब नको म्हणून याबाबत आदरणीय शास्त्री बाबांना कल्पना दिली असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी श्री क्षेत्र भगवानगड, आदरणीय महंत न्यायाचार्य ह.भ.प. डॉ. नामदेव महाराज शास्त्री तसेच समस्त पिंपळनेर वासियांची हृदहपूर्वक क्षमाही मागितली आहे. (Beed News) विशेष म्हणजे पाच तासापुर्वीच मुंडे यांनी आपण आज दुपारी 12 वाजता पिंपळनेर ता. शिरूर कासार येथे भगवानगडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात आशीर्वाद घ्यायला येत असल्याची पोस्ट केली होती.

EX Minister Dhananjay Munde News
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी मानले अजितदादांचे आभार! ही फक्त एक घोषणा नाही, तर दिलेली ही संधी...

मंत्री पद गमावल्यानंतर पहिल्याच नारळी सप्ताहात धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. यापुर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड येथील बैठकीला धनंजय मुंडे गैरहजर राहिले होते. आपल्या या गैरहजेरीचा कोणी चुकीचा अर्थ लावू नये, म्हणून त्यांनी त्यामागचे कारणही सामाज माध्यावर पोस्ट व्हायरल करत दिले होते.

EX Minister Dhananjay Munde News
Bhagwangad Beed News : भगवान गडावर धस आणि मुंडे एकत्र येणार?, काय म्हणाले धस?

डोळ्यावरील उपचारासाठी डाॅक्टरांकडे जात असल्याने बीडला येऊ शकणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. परंतु बीडमधील अजित पवारांच्या बैठकीकडे पाठ फिरवणारे धनंजय मुंडे आपल्या मुलीच्या फॅशन शो स्पर्धेला मात्र आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमातील त्यांच्या सहभागाचे कुटुंबासोबतचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली होती.

EX Minister Dhananjay Munde News
Suresh Dhas-Sandip Kshirsagar News : सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यावर 39 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप !

आता पिंपळनेर येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात धनंजय मुंडे यांची गैरहजेरी पून्हा चर्चेचा विषय ठरत आहे. धनंजय मुंडे यांनी याचे कारण स्पष्ट केले असले तरी ते पटणार का? हा खरा प्रश्न आहे. विमान उड्डाणास परवानगी मिळत नसल्यामुळे आपण दौरा रद्द करत असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. आता ते येणार नाही हे निश्चित झाले असून त्यांच्या गैरहजेरीची चर्चा मात्र सुरूच राहणार आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com