Ajit Pawar | Eknath Shinde | Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Dhangar Reservation :'...तर सरकारच्या तोंडावर राजीनामा फेकू', धनगर आरक्षणावर आमदार भडकला

Roshan More

Dhangar Reservation Updates : धनगर आरक्षणासाठी धनगर नेत्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यात सरकार धनगड आणि धनगरमधील संभ्रम दूर करण्यासाठी जीआर काढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी आमदार हिरामण खोसकर यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

'सरकारने धनगर आणि धनगडवरील आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर आम्ही 15 आदिवासी आमदार सरकारच्या तोंडावर राजीनामा फेकू', असा संताप आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केला आहे.

नरहरी झिरवळ यांनी आदिवासी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर हिरामण कोसकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

खोसकर म्हणाले, 'आम्ही आमदार राष्ट्रपती मॅडमला भेटायला गेलो होतो. आम्ही त्यांच्याकडे व्यथा मांडल्या. तेव्हा त्यांनी राज्य सरकारला असा आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेता येत नाही. कुठल्याही राज्याला तसे अधिकार नाहीत, असे सांगितले.'

'काही मतदारसंघात 30 टक्के, 40 टक्के आदिवासी मतदान आहे.सरकारने जर काही चुकीची भूमिका घेतली तर आमचा समजा यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही', असा इशारा देखील हिरामण खोसकर यांनी सरकारला दिला आहे.

सरकारकडून समिती

सरकारने धनगड आणि धनगर शब्दातील संभ्रम दूर करण्यासाठी समितीची स्थापना करणार असल्याचे आश्वासन सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला देण्यात आले आहे. शिवाय दुसऱ्या राज्यात धनगड आणि धनगर विषयी अभ्यास करणाऱ्या समितीला देखील मुदतवाढ देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT