NCP News : अजितदादांचा बडा नेता शरद पवारांच्या भेटीला; सातारा-जावळीतून मागितली उमेदवारी

Political News : रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवार गटाच्या बड्या नेत्यांनी भेट घेत सातारा-जावळी मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Satara News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुका तोंडावर आल्या असल्याने जागवाटपापूर्वीच उमेदवारी मिळवण्यासाठी नेतेमंडळींकडून प्रयत्न सुरु आहेत. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवार गटाच्या बड्या नेत्यांनी भेट घेत सातारा-जावळी मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी रविवारी येथील शासकीय विश्रामगृहात खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात जनतेचा पाठिंबा वाढत आहे, त्यामुळे आपल्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळावे, अशी थेट इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या मागणीला पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे. (NCP News )

यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष साधू चिकणे,अमित कदम यांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे साताऱ्याचे कार्याध्यक्ष अमित कदम यांनी रविवारी खासदार शरद पवार यांची येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास कदम हे इच्छुक आहेत. या मागणीचा विचार करावा, अशी मागणी अमित कदम यांनी शरद पवार यांच्याकडे केली. या भेटीनंतर यासंदर्भातील आपली पुरेपूर माहिती मला आहे. या संदर्भात आपण योग्यवेळी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.

Sharad Pawar News
Ajit Pawar News : 'दादा आपसे बैर नही, राजन पाटील तेरी खैर नही'; अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक

शासकीय विश्रामगृहाबाहेर पत्रकारांनी अमित कदम यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ' ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात सध्या भाजपचे वर्चस्व आहे. येथील कार्यकर्त्याला बळ मिळावे, यासाठी राष्ट्रवादीची ताकद निर्माण होणे गरजेचे आहे.'

सातारा-जावळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा जनसंवाद मेळावा नुकताच आम्ही मेढा येथे घेतला. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेण्याची हीच वेळ आहे, असे सांगत आपल्याला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. मी सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी त्यांची इच्छा असून त्यासाठीच मी शरद पवार यांची भेट घेतली आहे.

या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद देणे, कार्यकर्त्यांचे जाळे उभे राहणे यासाठी ही निवडणूक लढवणे गरजेचे असल्याचे आपण अजित पवार यांना सांगितले आहे. दादांनी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी नकारही दिलेला नाही. अमित कदम यांच्या या पवित्र्यामुळे ते शरदचंद्र पवार गटात जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Sharad Pawar News
Supriya Sule News : राज्याचा मुख्यमंत्री कसा व्हावा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com