Mumbai News : तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा जोरात सुरु आहे.
महाविकास आघाडीने त्यामध्ये आघाडी घेतली असून जवळपास 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण केली आहे. पितृपक्ष संपल्यानंतर जागावाटपाची घोषणा करण्यात येणार आहे. घटस्थापना झाल्यानंतर म्हणजेच 3 ऑक्टोबरच्या आसपास ही घोषणा होऊ शकते, अशी माहिती काँग्रेसचे (Congress ) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी (NCP) शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांनी दिली आहे.
गेल्या चार दिवसात महाविकास आघाडीचे जागावाटप काय असावं? या विषयावर तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये मॅरेथॉन बैठका झाल्या. या बैठकीत जवळपास 80 टक्के जागावाटपावर चर्चा झाली आहे. या बैठकांनंतर जागावाटपावर अंतिम निर्णय हा तीनही पक्षांचे पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. ज्या जागांवर तिढा आहे, त्या जागांचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीला जागावाटप लवकरात लवकर ठरवणं जास्त गरजेचं असणार आहे. कारण तितका वेळ प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकीच्या प्रचाराला देता येणार आहे. जागावाटपाची चर्चा सुरू आहे. येणाऱ्या आठ दिवसात चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडीमध्ये कोण किती जागा लढवेल हे महत्वाचे नाही. तर जनतेच्या विरोधात असलेले सरकार सत्तेतून बाहेर काढणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.
यावेळी नाना पटोले यांना जागावाटपाचं सूत्र काय ठरलं? याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. काही प्रसारमाध्यमांनी तीनही पक्ष 100-100 जागा लढवेल, असे सूत्र सांगितले. जागा 288 जागा असताना हे कसे शक्य आहे?, असा सवाल त्यांनी केला.
महाविकास आघाडीच्या जागांचे वाटप दोन-तीन तारखेपर्यंत पूर्ण होईल असे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर निशाणा साधला. हजारो कोटी रुपयांची कामे जर तुम्ही आणली तर रस्ते का एवढे खराब?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.