New dehli news : दिल्लीत जंतर मंतरवर सुरु असलेल्या 'सीजेपी'च्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर शनिवारी राजीनामा द्यावा लागला आहे. त्यानंतर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर दुसरीकडे त्यानंतर काही वेळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. दोन बडे नेते दिल्लीत गेल्यानंतर राज्यात चर्चेला उधाण आल्यानंतर सीएम फडणवीस यांनी पहिले ट्विट केले आहे. त्यामध्ये प्रधान यांच्या राजीनाम्यावर बोलले आहेत.
दिल्लीत महिनाभर सुरु असलेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकार पूर्णपणे बॅकफूटला गेले होते. संसदेपर्यंत जाऊन युवकांनी आक्रमकपणे आंदोलन केले. त्यामुळे केंद्र सरकारने नरमाइची भूमिका घेत आंदोलकासोबत चर्चा केली. त्यानंतर एक-दोन चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या. त्यानंतर प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला.
त्यानंतर लगेचच सीएम देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर दुसरीकडे त्यानंतर काही वेळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस हे केंद्रीय शिक्षणमंत्री होतील असा दावा केल्याने चर्चेला उधाण आले होते.
त्यातच शनिवारी सायंकाळी सीएम फडणवीस यांनी याबाबत दिल्लीतून पहिले ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, धर्मेंद्र प्रधान यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' (National Education Policy) लागू करण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. 'पीएम श्री' शाळांची सुरुवात, परदेशात आयआयटींचा विस्तार आणि प्रवेश परीक्षांचा १९ भाषांमध्ये विस्तार, यांसारख्या अनेक सुधारणा त्यांनी अंमलात आणल्या आहेत.
समाजाच्या व्यापक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता दर्शवत, त्यांनी शनिवारी आपला राजीनामा सादर केला. त्यांनी वैयक्तिक लाभापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य दिले, जे एका खऱ्या भाजप कार्यकर्त्याचे वैशिष्ट्य आहे.' असे सीएम फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.