Sharad Pawar News : भेटीदरम्यान PM मोदींना दिला सल्ला अन् राजीनामा झाला! शरद पवारांनी सांगितली Inside Story

Sharad Pawar reveals discussion News : या आंदोलनादरम्यान सर्वाधिक चर्चेत राहिली ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट.
PM Modi-Sharad Pawar meeting.
PM Modi-Sharad Pawar meeting.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, या आंदोलनादरम्यान सर्वाधिक चर्चेत राहिली ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. या भेटीदरम्यान नेमकं काय झालं याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या मात्र आता या बैठकीबाबतचा इतिवृत्त खुद्द शरद पवार यांनी सांगितला आहे.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले, 'नीट पेपर फुटी प्रकरणी तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या लढा हा कौतुकास्पद होता. दडपशाहीला न घाबरता दिलेल्या या लढ्यामुळे अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. हा एकजुटीचा विजय म्हणावा लागेल,' असे पवार म्हणाले.

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या बैठकीबाबत माहिती दिली. पवार म्हणाले, 'मी जेव्हा पंतप्रधानांना भेटलो त्यावेळेस त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवण्याची आवश्यकता असते. संवाद न ठेवल्याने त्याचे दुष्परिणाम होत असतात त्यामुळे तुम्ही संवाद सुरू केला पाहिजे. त्यासोबतच एक तर राजीनामा घ्यावा अथवा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहे. त्याबाबत विद्यार्थ्यांची संवाद साधावा, अशी विनंती मी मोदी यांना केली होती.'

PM Modi-Sharad Pawar meeting.
Sharad Pawar On Pradhan : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया : ‘लोकशाहीने कात टाकली...युवा पिढीला श्रेय’

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही सहकाऱ्यांनी आंदोलकांशी भेटून चर्चा केली. त्यापूर्वी अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील आम्ही सांगितले होते की, सरकार तुमच्याशी चर्चा करायला आले तर त्यांच्याशी संवाद साधा. त्यासोबतच संवादाचे दरवाजे बंद करू नका मात्र सुदैवाने विद्यार्थ्यांची चर्चा करण्याची तयारी होती.

त्यामुळे माझ्यात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीच्या परिणाम दिसला आणि त्यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांना नियुक्त केले आणि चर्चेचे दोन राउंड झाले. या बैठकीनंतर एक मागणी सोडून इतर सर्व मागण्याबाबत विचार करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली होती. त्यानंतर आता शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांची मागणी मान्य करून राजीनामा दिला आहे.

पवार पुढे म्हणाले, 'मी भेटी दरम्यान मोदींना आग्रहाने हे सांगितले होते की बोलायचे बंद करू नका आणि पोलीस यंत्रणा या विद्यार्थ्यांच्या विरोधात वापरू नका. जी मागणी केली त्याची नोंद त्यांनी घेतली असावी. त्यानंतर संवाद आणि राजीनाम्याची प्रत्यक्ष झालेली कृती मी पाहत आहे. त्यामुळे यापेक्षा वेगळा निष्कर्ष मी काढणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

PM Modi-Sharad Pawar meeting.
Dharmendra Pradhan salary : धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री म्हणून दर महिन्याला किती मिळायचा पगार? जाणून घ्या सुविधांचे गणित

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com